27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रअयोध्येत मशिदीसाठी जागा  स्वीकारणार नाही : जमीयत उलेमा-ए-हिंद

अयोध्येत मशिदीसाठी जागा  स्वीकारणार नाही : जमीयत उलेमा-ए-हिंद

लय भारी न्यूज नेटवर्क 

दिल्ली : अयोध्या निकालाच्या वेळी न्यायालयाने पाच एकर जमिन मशिदीसाठी देण्यात येईल असा निर्णय दिला होता. मात्र मशिदीसाठी पर्यायी पाच एकर जागा स्वीकारायची नाही असा निर्णय जमीयत उलेमा-ए-हिंदने घेतला आहे.

जमीयत उलेमा-ए-हिंद अयोध्या खटल्यामध्ये प्रमुख मुस्लीम पक्षकार आहे. पैसा असो, किंवा जमीन मशिदीला पर्याय म्हणून काहीही स्वीकारणार नाही असे जमीयत उलेमा-ए-हिंदने स्पष्ट केले आहे. जमीयत उलेमा-ए-हिंदच्या दिल्लीत झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पूनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता जमीयत उलेमा-ए-हिंदने फेटाळून लावलेली नाही.

जेयूएचचे अध्यक्ष अर्शद मादानी यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय सत्य शोधन समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर कायदेशीर सल्ला घेणार आहे. मशिदीला पर्याय म्हणून पैसा किंवा जमीन काहीही स्वीकारायचे नाही असा निर्णय कार्यकारी समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. जेयूएचचे उत्तर प्रदेशचे प्रमुख मौलाना असद रशीदी यांनी ही माहिती दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी