31 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रसीबीएससी बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा संदर्भात केंद्र सरकराचा 'हा' मोठा निर्णय!

सीबीएससी बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा संदर्भात केंद्र सरकराचा ‘हा’ मोठा निर्णय!

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यात शाले शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी सीबीएससीच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे देखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि ११वीच्या प्रवेशांचे काय? अशी चर्चा सुरू झाली असून त्यांच्या गुणपत्रिका ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियानुसार तयार करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

१ जून रोजी सीबीएससी घेणार परिस्थितीचा आढावा!

केंद्रीय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएससी परीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. परंतु, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता १ जून रोजी सीबीएससी कडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांचे काय?

महाराष्ट्र सरकारने याआधीच महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भातला निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ११ एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. या आधारावर प्रशासकीय अधिकारी, पालक वर्ग आणि शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी