27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात लॉकडाऊन, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू...

पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू…

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील वाढत कोरोनाचा प्रादुर्भाव पाहात महाराष्ट्र राज्य सरकारने शनिवार आणि रविवारी मिनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन करण्यात आले आहे.  सातारा जिल्ह्यात दररोज ४०० ते ५०० च्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाने अशंत: लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर सातारा शहरातील व्यापाऱ्यांन या अंशत: लॉकडाऊनला विरोध केला आहे. शहरातील खणआळी परिसरात व्यापाऱ्यांकडून निदर्शने करण्यात येत आहेत.

सोमवार ते शुक्रवार सकाळी ते फक्त अत्यावशक सेवा राहणार सुरु

राज्य सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये रुग्णालये, निदान केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मेसियां, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा. किराणा सामान, भाजीपाला, दुकाने, दुग्धशाळा, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने यांचा समावेश असेल. तर सार्वजनिक परिवहन सेवेतील ट्रेन, गाड्या, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस या देखील सुरु राहणार आहेत. स्थानिक प्राधिकरणांकडून किंवा शासनाकडून मान्सूनपूर्व कार्यवाहीची कामे, स्थानिक प्राधिकरणाव्दारे देण्यात येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा. वस्तूंची वाहतूक, कृषी संबंधित सेवा, या सेवा सुरु राहणार आहेत. ई-कॉमर्स, अधिकृत मीडिया, पेट्रोल पंप देखील सुरु राहणार आहेत.

शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मिनी लॉकडाऊन

राज्य सरकारच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात देखील मिनी लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री ५ ते सोमवारी सकाळी ८ पर्यंत मिनी लॉकडाऊन लागू करण्यात येईल. हे नियम ३० एप्रिलपर्यंत सुरु राहतील.

व्यापारी संघटनेचा विरोध

सातारा जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनला सातारा शहरातील व्यापारी संघटनेने विरोध केला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या खणआळी परिसरात लॉकडाऊनला विरोध करत निदर्शने केली आहेत. शहरातील दुकाने उघडण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांबाबत जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील नागरिकांना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी