26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रआठवले, जानकर, कवाडे म्हणाले मोदींच्या विजयासाठी एकदिलाने काम करु !

आठवले, जानकर, कवाडे म्हणाले मोदींच्या विजयासाठी एकदिलाने काम करु !

मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन कली असून त्यांची तीसरी बैठक मुंबईत पार पडली. दुसरीकडे सत्ताधारी महायुतीची बैठक देखील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली. भाजपसह राज्यात महायुतीत सहभागी असणाऱ्या छोट्या मोठ्या पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली. भाजपवर काही दिवसांपूर्वी नाराज झालेले राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर देखील या बैठकीला उपस्थित होते. मोदींच्या आगामी लोकसभेसाठी महाराष्ट्रातील सर्व 48 जागा जिंकण्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महायुतीच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रहारचे बच्चू कडू, रासपाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, जनसुराज्यचे विनय कोरे, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे आदी नेते, मंत्री, खासदार, महायुतीतील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत एकूण 3 ठराव पारित करण्यात आले. दोन ठराव अभिनंदनाचे होते, तर एक ठराव लोकसभा निवडणुकीच्या संकल्पाचा होता.

हे सुद्धा वाचा 
बिग बींसोबत किंग खान; 17 वर्षानंतर जोडी येणार एकत्र
ठाण्यातील सफाई कर्मचाऱ्यांची मज्जाय बे!
‘गदर2’ मुळे सनी देओलला सुगीचे दिवस; 500 कोटींकडे वाटचाल

2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दणदणीत बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते स्वतःला संकल्पबद्ध करीत आहेत, असेही तीसऱ्या ठरावात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि एकदिलाने काम करू, अशा आशयाची भाषणे यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, जोगेंद्र कवाडे यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी