35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र चेंबरच्या बिझनेस फोरममुळे व्यापाराच्या अफाट संधी :ललित गांधी

महाराष्ट्र चेंबरच्या बिझनेस फोरममुळे व्यापाराच्या अफाट संधी :ललित गांधी

नाशिकच्या पवित्र भूमीत अर्धशतकापूर्वी महाराष्ट्र चेंबरची ( maharashtra chamber of commerce ) उत्तर महाराष्ट्र शाखा सुरु झाल्याने विकासनोमुख कार्याचा एक रचनात्मक पाया रचला गेला. गेल्या पाच दशकांमध्ये एकूणच झालेले आर्थिक क्षेत्रालातील स्थित्यांतरे आणि काळाची नवी पाऊले लक्षात घेऊन याच पवित्र भूमीत व्यापार विकासाच्या आणि वाढीच्या वैयक्तिक आणि समूह स्तरावर संधी देणाऱ्या मासिआ बिझनेस नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून एक नवे सशक्त पाऊल पुन्हा उचलले गेले आहे. यामुळे महाराष्ट्र चेंबरच्या सभासदांना केवळ महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आणि परदेशातही व्यापार संपर्क स्थापित करता येणार आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय उद्योजक व चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी ( lalit gandhi )यांनी मासिआ बिझनेस नेटवर्किंग फोरमचे उदघाटन करतांना केले.( Maharashtra Chamber of Commerce Forum offers immense business opportunities: Lalit Gandhi)

सुरवातीला उत्तर महाराष्ट्र शाखा कार्यालयाचे चेअरमन संजय सोनवणे यांनी स्वागत केल्यावर उपद्य्क्ष कांतीलाल चोपडा यांनी आपल्या प्रास्ताविकातून चेंबरने दिलेल्या महत्वाच्या कार्याचा आढावा घेतला. व्यापार उद्योगातील समस्या सोडवीत असताना सभासदांचा व्यापार वाढावा यासाठी सुरु करत असलेल्या मासिआ नेटवर्किंग बिझनेस फोरममुळे एक नवा अध्याय लिहिला जात आहे असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर या फोरम चे चेअरमन दत्ता भालेराव यांनी फोरम संदर्भातील सविस्तर माहिती देऊन फोरममुळे कसा व्यापार वाढतो यासंदर्भांतील विविध उदाहरणे दिली. सततचा संपर्क ठेऊन फोरमच्या सभासदानी डोळसपणे परस्परांशी विचारातून संधी साधने यासंदर्भातही त्यांनी अनुभव कथन केले. पुढील काही महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र असे फोरम कार्यरत केले जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांनी फोरमच्या कार्याला शुभेच्छा देत सर्वांनी त्यात मोठा सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
याप्रसंगी महिला समितीतर्फे महिला उद्योजिका इ न्युज लेटर यासंदर्भांत महिला समितीच्या चेअरपर्सन सौ संगीता पाटील यांनी माहिती दिली आणि त्याचे प्रकाशन चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. चेंबरच्या सभासदांनाही या इ बुलेटिन मध्ये आपला सहभाग नोंदवता येईल असेही सौ. पाटील यांनी स्पष्ट केले. कार्यकारिणी सदस्य सचिन शहा यांनी आभार मानले.
याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीची आणि कार्यकारी मंडळाची खास सभाही नाशिकला झाली. या सभांमधून व्यापार उद्योग क्षेत्राला जाणवणाऱ्या सद्य समस्यांवर विचार विनिमय करण्यात आला. यानिमित्ताने पूर्वध्यक्ष संतोष मंडलेचा,उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष रविंद्र माणगावे, उपाध्यक्ष एस. दि. परब, उपाध्यक्ष नितीन बंग, उपाध्यक्ष तनसुख झाबंड, विश्व्स्त विलास शिरोरे, सरकार्यवाह सुरेश घोरपडे व नाशिक मुंबई, ठाणे, कोकण, धुळे, जळगाव, सांगली, पुणे आदी भागातील चेंबरचे विविध समित्यांचे अध्यक्ष , कार्यकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मासिआ बिझनेस नेटवर्किंग फोरमच्या सदस्यांचा विशेष सत्कार
दत्ता भालेराव, राजाराम सांगळे, संजय सोनवणे, राजेश मालपुरे, रवींद्र झोपे, राजेंद्र कोठावदे, सचिन शहा, रवि जैन, बाळासाहेब आंब्रे, संदिप सोमवंशी, रुपेश कणसे, वर्षा मनोज सोमय्या, भरत येवला, अमित पवार, लोकेश लुणावत, ललित नहार, गौरव सोनार, हेमंत कांकरिया, निलेश दुसाने, विलास शिरोरे, आदि सदस्यांचा अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एकनाथ अमृतकर, विजय बाविस्कर, मनिष रावल, निवृत्ती कापसे यांचाही सत्कार करण्यात आला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी