35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयप्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; कोल्हापुरात शाहू महाराजांना 'वंचित'चा पाठिंबा

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; कोल्हापुरात शाहू महाराजांना ‘वंचित’चा पाठिंबा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी रिंगणात करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज(Kolhapur Shahu Maharaj Chhatrapati) उतरले आहेत. यांना उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान आता 'वंचित'चा देखील पाठिंबा मिळाला आहे. 'शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचं कुटुंब चळवळीच्या जवळचं कुटुंब असल्याचं आम्ही मानतो. तीनही ठिकाणी निर्णय घेण्यात आलाय की, पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पाठिंबा आहे.' असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.(Prakash Ambedkar support to Kolhapur Shahu Maharaj Chhatrapati)

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी रिंगणात करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज(Kolhapur Shahu Maharaj Chhatrapati) उतरले आहेत. यांना उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान आता ‘वंचित’चा देखील पाठिंबा मिळाला आहे. ‘शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचं कुटुंब चळवळीच्या जवळचं कुटुंब असल्याचं आम्ही मानतो. तीनही ठिकाणी निर्णय घेण्यात आलाय की, पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पाठिंबा आहे.’ असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.(Prakash Ambedkar support to Kolhapur Shahu Maharaj Chhatrapati)

प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली. प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीसोबत एकत्र लढण्याचा निर्णय झालेला नाही. पण तरीसुद्धा त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली.

भाजपला धक्का; तिकीट जाहीर झालेल्या उमेदवारांची माघार

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचं कुटुंब चळवळीच्या जवळचं कुटुंब असल्याचं आम्ही मानतो. तीनही ठिकाणी निर्णय घेण्यात आलाय की, पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न केले जातील. मागे जे घडलं होतं ते यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा घेण्यात येईल. कोल्हापुरात शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे.

त्यांच्या या पाठिंब्यानंतर कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करून समतेचा विचार आणि संविधान टिकवण्यासाठी आपला पाठिंबा आम्हांला निश्चितच बळ देईल, असे म्हटले आहे.

26 तारखेला घेणार मोठा निर्णय

महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा तिढा संपल्याचे बोलण्यात येत आहे. मात्र, आमच्याकडे अजून त्या प्रकारे कोणतीही बोलणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. जागा वाटपामध्ये तिढा मिटत नसेल तर आम्ही एन्ट्री करुन काय करायचं? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, आम्हाला कोणाला काही कळवण्याची गरज नाही, आम्ही जनतेला सर्व काही कळवू. 26 तारखेला आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत, त्यावेळी आमची भूमिका स्पष्ट करू असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हटले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी