28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रRevenue Department : जमीनजुमल्याच्या किचकट समस्यांची उत्तरे एका क्लिकवर; महसूल विभागाने केले...

Revenue Department : जमीनजुमल्याच्या किचकट समस्यांची उत्तरे एका क्लिकवर; महसूल विभागाने केले लोकांच्या 5000 समस्यांचे निराकरण

महसूल खात्याने अनोख्या पद्धदीने वेबसाईट डिझाईन केल्यामुळे जमीनींसदर्भात समस्या सोडविण्यासाठी महसूल विभागाला मोठी मदत झाली आहे. महसूल विभागाच्या वेबसाईटवर नुकतेच जमीनीसंदर्भात 5 हजार समस्यांचा निपटारा केला आहे. ही वेबसाइट मराठीत आहे, त्यामुळे येथे नागरिकांना त्यांचे प्रश्न उपस्थित करणे आणि त्याची उत्तरे समजणे अधिक सोपे आहे.

सध्या जमीनीला सोन्याचे भाव आले असून दिवसेंदिवस जमीनीसंदर्भात वादविवाद देखील वाढत आहेत. जमीनीच्या मालकी हक्कापासून फसवणूक, खरेदीविक्रीसंदर्भात अनेक समस्यांचे खटले दिवसेंदिवस वाढत आहेत. महसूल खात्याकडे अशा समस्या, खटल्यांच्या प्रकरणांचा खच पडत असताना आता या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महसूल खात्याने अनोख्या पद्धदीने वेबसाईट डिझाईन केल्यामुळे जमीनींसदर्भात समस्या सोडविण्यासाठी महसूल विभागाला मोठी मदत झाली आहे. महसूल विभागाच्या वेबसाईटवर नुकतेच जमीनीसंदर्भात 5 हजार समस्यांचा निपटारा केला आहे. ही वेबसाइट मराठीत आहे, त्यामुळे येथे नागरिकांना त्यांचे प्रश्न उपस्थित करणे आणि त्याची उत्तरे समजणे अधिक सोपे आहे.

महसूल विभागाने विकसित केलेली वेबसाईट maharashtracivilservice.org अशी असून मुंबई उपनगर जिल्ह्याचे वरिष्ठ उपजिल्हाधिकारी डॉ. विकास नाईक यांनी हि वेबसाईट विकसीत केली आहे. वेबसाईट maharashtracivilservice.org अशी ही बेबसाईट आहे. डॉ. नाईक यांनी बराच काळ विदर्भ आणि मराठवाड्यात काम केले आहे. या वेबसाईटवर साधारण महसूल विभागाचे अडीच हजार अधिकारी असून ते दर आठवड्याला जमीनीसंदर्भात राज्यभरातून येणाऱ्या साधारण डझनभर समस्यांचा निपटारा केला जात आहे.

डॉ. नाईक म्हणाले की, माझ्या गावेच अनेक लोक मला त्यांच्या समस्यांच्या अडीअडचणींबबत नेहमी विचारत असतात. त्यामुळे मी अशा समस्यांचा अधिक गतीने निपटारा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन काही करता येईल का? याचा विचार करत होतो. त्यातूनच मला अशी वेबसाई डिझाईन करण्याचा विचार मनात आला की, लोक कोठूनही त्यांच्या जमीनी संदर्भात समस्या, प्रश्न विचारू शकतील, या वेबसाईवर महसूल विभागाचे अधिकारी, जमीन हस्तांतरण, नावे लावणे, बदलणे, प्रॉपर्टी कार्ड, भू संपादन, वारसाहक्क याबाबत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करतात, तसेच अवघ्या 4 ते 5 दिवसांत एखाद्या समस्येबाबत ते ऊत्तर देखील वेबसाईच्या माध्यमातून संबंधीत व्यक्तीला देतात.

डॉ नाईक म्हणाले, या वेबसाईटला महाराष्ट्र नागरी (महसूल) सेवा संस्थेचा हातभार असून या संस्थेचे सभासद ही वेबसाईट हाताळतात, तसेच नागरिकांचे प्रश्न आणि समस्यांचे निराकरण करतात. या वेबसाईटचा जनपीठ टॅब हा सर्वाधिक लोकप्रिय ठरला असून दुसरा विभाग हा ‘ज्ञान केंद्र’ असा आहे. या विभागात जमीनीच्या प्रकरणांसदर्भात अधिनियम आणि कायदे, शासन निर्णय, पुस्तके आहेत. अनेक कुटुंबांमध्ये मुलींना संपत्तीचा अधिकार नाकारला जातो. त्यामुळे या वेबसाईटवर 7/12 खाते उताऱ्यावरून मुलींची नावे वगळण्यासंदर्भात प्रश्न विचारले जातात. कायद्याने कुटुंबातील मुलांप्रमाणे मुलींना देखील संपत्तीत समान वाटा दिलेला आहे. नागरिकांकडून असे प्रश्न अधिक विचारले जात आहेत. अशा किचकट प्रश्नांची उत्तरे या वेबसाईटवर नागरिकांना देण्यात येतात.

हे सुद्धा वाचा :
Zakir Naik : 5 देशांत बंदी असलेला झाकीर नाईक ‘फिफा’चा चीफ गेस्ट! जगभरातून टीकेची झोड

Chandrakant Khaire : महाप्रबोधिनी यात्रेत चंद्रकांत खैरेंनी साधला दीपाली सय्यदवर निशाणा

Supriya Sule : ‘श्रद्धा हत्याकांडाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करा!’ सुप्रिया सुळेंची मागणी

या वेबसाईटवर महसूल विभागातील कोणताही अधिकारी साईन अप करु शकतो, तसेच नागिरकांच्या समस्यांचे निराकरण करु शकतो, असे डॉ. नाईक यांनी सांगितले. मुद्रांक विभागातील अधिकारी किरण पाणबुडे हे या वेबसाईटवर अधिक सक्रीय असून ते नागरिकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत असतात. या वेबसाईटवर अनेक अधिकाऱ्यांनी साईन अप केले असून कोणताही महसूल अधिकारी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण या वेबसाईटवर करु शकतो, असेही डॉ. नाईक यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी