29 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडी संकटात राजकारण करत नाही ; संजय राऊतांचा भाजपला टोला

महाविकास आघाडी संकटात राजकारण करत नाही ; संजय राऊतांचा भाजपला टोला

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचे संकट असताना लस, इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. विरोधीपक्ष नेते यांचे राजकारण करत आहेत. कोरोनाच्या संकटात सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे (Shiv Sena leader Sanjay Raut criticizes BJP).

सध्या सगळेच या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला साथ द्या. राजकारण करू नका, असे सांगतानाच संकट ही संधी मानून महाविकास आघाडी राजकारण करत नाही, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे. (shiv sena leader sanjay raut taunt bjp over corona crisis)

डॉ. सुजय विखेंनी आणलेल्या बॉक्समध्ये नेमकं काय होतं? ; रूपाली चाकणकरांचा सवाल

मोफत लस देण्याबाबत अद्याप निर्णय नाही, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे वाढला संभ्रम

संजय राऊत यांनी पत्रकाराशी संवाद साधताना विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला (Sanjay Raut, while interacting with a journalist, launched a scathing attack on the protesters). सध्या सगळेच संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रसंगी एकमेकांचे दोष काढणे योग्य नाही. मुंबईसह राज्यात कोरोनावर नियंत्रण येत आहे. त्यामुळे राजकारण करण्याची गरज नाही.

Interview: Doctors explain what Indians should do if they start showing Covid-19 symptoms

सर्वांनी एकत्रे येऊन काम करावे. तरच संकटाला तोंड देता येईल. सध्याच्या काळात राजकारण करणे योग्य नाही. राजकारण करण्याची आपली परंपरा नाही आणि सध्याच्या वातावरणात राजकारण करणे ही योग्य नाही,  असे सांगतानाच महाविकास आघाडी संकट ही संधी मानून कधीच राजकारण करत नाही, असे संजय राऊत म्हणाले (Mahavikas Aghadi never takes politics as an opportunity, says Sanjay Raut).

मोफत लसीकरण हा सरकारचा निर्णय

यावेळी त्यांनी मोफत लसीकरणावरही भाष्य केले. हा सरकारचा विषय आहे. जनतेच्या हिताचा निर्णय सरकार घेईल. कोणत्याही राजकारणाशिवाय हा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मजबुतीने काम करत आहेत. विरोधकांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे. रुग्णांचा जीव वाचवणे हे आपले प्राधान्य आहे, असे ही संजय राऊत म्हणाले (Our priority is to save the lives of patients, said Sanjay Raut).

ऑक्सिजनशिवाय कुणाचाही बळी नाही

केंद्राने मंजूर करून आणि निधी देऊनही राज्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले नाहीत, या विरोधकांच्या आरोपांचे त्यांनी खंडन केले. महाराष्ट्रात ऑक्सिजनशिवाय कुणाचाही बळी गेला नाही. उत्तर प्रदेशात, दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. अशाप्रकारचे घाणेरडे आरोप विरोधकांनी करू नये. मी यूपी, बिहार आणि दिल्लीची महाराष्ट्राशी तुलना करत नाही. पण या राज्यांमध्ये जाऊन पाहा, त्या तुलनते महाराष्ट्र निश्चितच चांगले काम करत आहे, असे ही संजय राऊत म्हणाले (Maharashtra is definitely doing well, said Sanjay Raut).

आघाडी एकत्रित सामना करेल

यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने मारलेल्या छाप्यांवरही त्यांनी भाष्य केले. अशा प्रकारच्या छापेमारी मागे राजकीय षडयंत्र असेल तर आघाडीतील तिन्ही पक्ष त्याचा एकत्रितपणे सामना करतील असे ही त्यांनी स्पष्ट केले. (shiv sena leader sanjay raut taunt bjp over corona crisis)

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी