35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईमनाशिकमध्ये गावठी कट्टा विकणारा अटकेत

नाशिकमध्ये गावठी कट्टा विकणारा अटकेत

गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ३० हजार ५०० रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, बुधवार दि. ३० रोजी गुन्हेशाखा युनिट एकचे पोहवा प्रविण वाघमारे आणि पोना प्रशांत मरकड यांना माहिती मिळाली कि, रेकॉर्ड वरील गुन्हेगार अरूण दिगंबर बिडगर हा सुविधा पेट्रोल पंपाच्या अलीकडे, ड्रिम कॅसल कडे जाणाऱ्या रोडवर गावठी बनावटीचे पिस्तूल (कटटा) व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी येणार आहे. . हि माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिली असता त्यांनी पोहवा प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, पोहवा भांड, योगीराज गायकवाड, पोना प्रशांत मरकड, चापोहवा नाझीमखान पठाण यांना संबंधित ठिकाणी सापळा रचण्यास सांगितले.

गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ३० हजार ५०० रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, बुधवार दि. ३० रोजी गुन्हेशाखा युनिट एकचे पोहवा प्रविण वाघमारे आणि पोना प्रशांत मरकड यांना माहिती मिळाली कि, रेकॉर्ड वरील गुन्हेगार अरूण दिगंबर बिडगर हा सुविधा पेट्रोल पंपाच्या अलीकडे, ड्रिम कॅसल कडे जाणाऱ्या रोडवर गावठी बनावटीचे पिस्तूल (कटटा) व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी येणार आहे. . हि माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिली असता त्यांनी पोहवा प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, पोहवा भांड, योगीराज गायकवाड, पोना प्रशांत मरकड, चापोहवा नाझीमखान पठाण यांना संबंधित ठिकाणी सापळा रचण्यास सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार संसायीट अरुण दिगंबर बिडगर, २६, रा. केकाण चाळ रामवाडी, पंचवटी नाशिक याला घटनास्थळी पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३० हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तोल, ५०० रुपये किमतीचे १ जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आले. या संशयितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

नाशिक जिल्ह्यात दुचाकी चोरणारी टोळी अटकेत

अलिकडच्या काळात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दुचाकींची चोरी झाली आहे. नाशिक जिल्ह्यातून चोरीला गेलेल्या तब्बल 16 दुचाकी हस्तगत करण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे. दुचाकी चोरणाऱ्या तिघा संशयितांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकार उपस्थित होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर शांतीलाल कायस्थ यांची हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स दुचाकी (एम.एच.41 बी.के.1088) ही चोरी गेली होती. कायस्थ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नांदगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच इतरही दोन दुचाकी चोरल्याच्या घटना नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या होत्या.

पोलिसांनी संशयित अंकुश दादासाहेब गायकवाड (रा.नांदुर ता.नांदगांव ) यास ताब्यात घेतले. त्याचा दुसरा साथीदार पवन शंकर आहिरे (रा. निंबायती ता. मालेगांव) यास शिरपुर (जि.धुळे) येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले तर तिसरा संशयित आरोपी हर्षल मनोहर गवारे यास शिवकृपानगर, राजविलास सोसायटी, बोरगड म्हसरुळ येथून ताब्यात घेतले.

या तिघांची सखोल चौकशी केली असता या तिघांच्या टोळीने नांदगांव पोलीस ठाणे हद्दीत चार, येवला शहर पोलीस ठाणे हद्दीत दोन, येवला तालुका,  मनमाड, लासलगांव, मालेगांव व छावणी पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी एक, पोलीस आयुक्तालय नाशिक शहर घटकातील पोलीस ठाणे हद्दीत सहा अशा एकूण 16 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. या टोळीकडून १6 दुचाकी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हस्तगत केल्या आहेत.

अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर,  मनोज वाघमारे, पोलीस हवालदार विनायक जगताप, धर्मराज अलगट, भारत कांदळकर, मुदस्सर शेख,अनिल शेरेकर, नंदू चव्हाण, दत्तू सोनवणे, दिपक मुंडे, सागर बोरसे, साईनाथ आहेर, परदेशी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी