28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रनाशकात हरवलेल्या मुलीचा दोन तासात पोलिसांनी लावला शोध

नाशकात हरवलेल्या मुलीचा दोन तासात पोलिसांनी लावला शोध

पंचवटी परिसरातून एका लहान बालिकेचे अपहरण करणाऱ्या महिलेला भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. गस्त घालत असताना पोलिसांच्या तीक्ष्ण आणि चाणाक्ष नजरेतून भिकारी महिलेच्या वर्णनावरून तिच्या हातातील बाळ तिचे नसल्याचे लक्षात आले आणि झालेल्या अपहरण नाट्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या मुलीला तिच्या आईच्या ताब्यात दिल्याने मुलीच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, भद्रकाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह  भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी गस्त घालत होते. या दरम्यान पोह नरेंद्र जाधव, संदीप शेळके, पोना लक्ष्मण ठेपने, महेशकुमार बोरसे यांना पिंपळ चौकात एक भिकारी महिला एक वर्षाच्या लहान बाळाला कडेवर घेऊन भीक मागत उभी असल्याचे दिसले. 

मात्र, पथकाने पाहणी केली असता तिच्या ताब्यातील बाळ हे मुलगा नसून मुलगी असल्याचे समजल्याने महिलेने बाळ कुठून तरी पळून आणल्याचा पोलिसांना दाट संशय आला.
त्यानंतर या संशयित महिलेकडे चौकशी करत तिला पोलिसी खाक्या दाखविताच तिने हे बाळ रामकुंड, गोदाघाट, पंचवटी येथून सोमवार दि. २२ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पळविल्याचे सांगितले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यातून माहिती घेतली असता त्यांनीही बाळ हरवल्याचे सांगितले. पोलिसांनी या संशयित महिलेला ताब्यात घेत पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

या लहान बाळाचे नाव सोनू विकी कांबळे, १, रा. बळी मंदिर चक्रधर नगर, जत्रा हॉटेल आडगाव, नाशिक असे असून संशयित बाळ पळून नेणाऱ्या संशयित महिलेचे नाव सुनिता अशोक काळे, ४५, रा. नाशिक रोड रेल्वे स्टेशन असून ती फिरस्ती असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अयोध्या येथे श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. यानिमित्ताने कांबळे कुटुंबिय पंचवटी परिसरातील मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी गोदाघाट परिसरात आले होते. या दरम्यान आपल्या लहान मुलीला खाली खेळण्यास सोडले. आणि त्याचवेळी या संशयित सुनीता काळे महिलेने आपला डाव साधत या मुलीचे अपहरण केले. आणि ती थेट भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन भीक मागू लागली. मात्र, आपण ज्या बाळाचे अपहरण केले आहे. ते बाळ मुलगा आणि कि मुलगी हे बघणे ती विसरली आणि पोलिसांच्या प्रश्नांपुढे तिचे पितळ उघडे पडले.

हरवलेल्या आपल्या एक वर्षाच्या मुलीचा शोध पोलिसांनी अवघ्या काही तासात लावत मुलीला तिच्या आईच्या कुशीत सोडल्याने या चिमुरडीच्या आणि तिच्या आईच्या चेहऱ्यावर एक वेगळेच चैतन्य दिसून आले. आपल्या चिमुरडीला बघताच आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. हे बघून येथील पोलीस कर्मचाऱ्यांना देखील गहिवरून आले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी