28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रlokasabhaelection;प्रत्येक गावात मराठा समाजाचा लोकसभेचा उमेदवार असणार

lokasabhaelection;प्रत्येक गावात मराठा समाजाचा लोकसभेचा उमेदवार असणार

सरकारने आपल्याला मराठा आरक्षण दिले नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला आरक्षण मिळावे अशी मागणी म्हणून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.

मुंबई ; प्रतिनिधी

सरकारने आपल्याला मराठा आरक्षण दिले नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला आरक्षण मिळावे अशी मागणी म्हणून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मागणी मान्य न झाल्यामुळे ते आता प्रत्येक गावात लोकसभेचा उमेदवार उभा करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितले आहे.

राज्यात सुमारे अडीच लाख मराठा युवक उमेदवारी अर्ज करतील. अशा पद्धतीचं राज्यभर नियोजन करण्याची तयारी सुरू आहे. 184 उमेदवारांची ‘ईव्हीएम’मध्ये नोंदणी करण्याची क्षमता आहे. मात्र यापुढे उमेदवार असल्यास निवडणूक आयोग सांगेल त्या पद्धतीनं प्रशासन काम करेल, असं निवडणूक विभाग उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितलं. एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागेल, असं मत अभ्यासकांनी व्यक्त केलंय.

प्रत्येक गावात मराठा समाज उभा राहिल्यास मातब्बर उमेदवारांना मते वळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. एकूणच आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यामुळे अशी भूमिका घेत असल्याचे सुद्धा कार्यकर्त्याचे यांच्याकडेन बोलले जात आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी