32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा मोर्चा मुंबईत धडकला

मराठा मोर्चा मुंबईत धडकला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईत शुक्रवारी सकाळी पोहचले. Maratha march hits Mumbai  आज प्रजासत्ताकदिनी ते आता नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटला पोहोचले आहेत. त्यांची तब्येत बरी नसल्याने दिवसभरातील वेळा बदलण्याची शक्यता आहे.सरकारच्या शिष्टमंडळासोबत त्यांची थोड्यावेळात चर्चा सुरू होईल अशी माहिती आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्य सरकार मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय जारी करण्याच्या तयारीत आहे.यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे, प्रशासकीय अधिकारी सुमंत भांगे, आणि काही मंत्री आहेतजरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वातील पदयात्रा मुंबईच्या वेशीवरच थांबावी, मुंबईत दाखल होऊ नये यासाठी सरकारचा हा शेवटचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न निष्फळ गेल्यास मराठा आंदोलक आज दुपारी मुंबईत दाखल होतील.

 

यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे, प्रशासकीय अधिकारी सुमंत भांगे, आणि काही मंत्री आहेत. यावेळी ओबीसी समाजाला आरक्षणाअंतर्गत मिळत असलेल्या सवलती मराठा समाजाला देण्याबाबतचा शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे.

जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वातील पदयात्रा मुंबईच्या वेशीवरच थांबावी, मुंबईत दाखल होऊ नये यासाठी सरकारचा हा शेवटचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न निष्फळ गेल्यास मराठा आंदोलक आज दुपारी मुंबईत दाखल होतील.

आज प्रजासत्ताक दिन आहे त्यामुळे संपूर्ण मुंबईत आणि नवी मुंबईत शासकीय कार्यक्रम होतील. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला काय वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना खारघर येथे आंदोलन करण्याची लेखी सूचना केली आहे.मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनास परवानगी नाकारली आहे. मात्र जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत आणि आंदोलन आझाद मैदानावरच करू असा निर्धार त्यांनी केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र जरांगे पाटीलांबद्दल विचारल्यावर त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. ते म्हणाले की, त्यांनाही शुभेच्छा देतो, सगळ्या जनतेलाच शुभेच्छा देतो.

25 जानेवारीला काय झालं?

गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा पुण्याहून लोणावळ्याकडे रवाना झाला. पुण्याच्या वाटेवर आणि पुण्यात त्यांना मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे मोर्चाच्या वेळा पाळल्या गेल्या नाहीत आणि नंतर ठिकठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला.
मुंबईच्या वेशीवर असताना आंदोलन शमवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले. जरांगेंच्या भेटीसाठी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधूकर अर्दड दाखल झाले.
तत्पूर्वी लोणावळ्याला त्यांनी भाषण केलं. त्यात मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मी आता सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करायला जातो आहे. समाजाला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. सरकार काय म्हणतंय ते बघू आणि मग आपण सगळे मिळून मुंबईकडे निघू.”
दरम्यान मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर जमण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली.

मुंबईत दररोज साठ ते पासष्ठ लाख लोक नोकरीच्या निमित्ताने येत असतात. अशावेळेस आपले आंदोलक मोठ्या संख्येने आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कच्या दिशेने आल्यास वाहतूक व्यवस्था कोलमडेल तसेच आझाद मैदान हे फक्त 7000 चौरस मीटर क्षेत्रफळाचे आहे.
तिथं फक्त 6000 लोक सामावून घेता येतात त्यामुळे आपण खारघरमधील इंटरनॅशनल पार्क मैदानाकडे जावं अशी सूचना आझाद मैदान पोलिसांनी केली.

मनोज जरांगेंना उच्च न्यायालयाची नोटीस

24 जानेवारीला दुपारच्या सुमारास गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी भुमिका मांडताना सदावर्तेंनी जरांगे दाखल होत आहेत तिथे गर्दीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. आणि शाळांनाही सुट्टी द्यावी लागत आहे, असा युक्तिवाद केला.

हा मोर्चा मुंबईत दाखल झाल्यास लोकांना अडचण होईल, असं म्हणत सदावर्तेंनी मोर्चाला मुंबईत यायला परवानगी नाकारण्याची मागणी केली.
तर यावेळी भूमिका मांडताना महाधिवक्त्यांनी आपल्याकडे परवानगीचा कोणताही अर्ज आला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना जरांगेना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

याविषयी जरांगे म्हणाले ” नोटीस बजावली म्हणून काय झालं. न्यायमंदिर आमच्याशी पण न्याय करणार. काय न्याय दिला हे आम्हाला बघावं लागेल. आम्ही न्यायालयाकडे गेलो तर आम्हाला पण न्याय देतील. कोणी काय म्हणल्याने चालत नसतं.”
तर सदावर्ते यांच्या याचिकेविषयी विचारल्यावर जरागेंनी त्यांना काय करायचं ते करू द्या. आम्हाला त्यांच्याबद्दल (सदावर्ते) विचारू पण नका. आमच्या मुंबईतल्या लोकांनी अर्ज केलेला आहे. आम्ही आमच्या गावाकडून एसपींना पण कळवलं आहे.

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी