33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : बीडच्या विवेकची सुसाईड नोट बनावट!

Maratha Reservation : बीडच्या विवेकची सुसाईड नोट बनावट!

टीम लय भारी

बीड : बीडमधील विवेक रहाडे या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येसंदर्भात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येचा फायदा घेण्यासाठी त्याची (Maratha Reservation) बनावट सुसाईड नोट तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उजेडात आला आहे. विवेकच्या मृत्यूचा फायदा घेत त्याच्या नावे बनावट सुसाईड नोट तयार केली. ती सुसाईड नोट सोशल मीडियाद्वारे व्हायरल करत सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन नमुन्यातून या सुसाईड नोटमधील हस्ताक्षर तपासले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या विवेक कल्याण रहाडे असं या १८ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता. शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने 15 दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. पण पेपर कठीण गेल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळतील की नाही? याची चिंता त्याला सतावत होती. या तणावातून त्याने बुधवारी (३० सप्टेंबर) दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवेकने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असून मृत्युपूर्वी त्याने तशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता.

उपलब्ध माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी विवेकने स्वत:च्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी सभोवतालची तपासणी आणि पंचनामा केला. परंतु, त्या दरम्यान त्यांना तेथे काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. मात्र, दरम्यान, विवेक वापरत असलेल्या रजिस्टरमधून त्याची सुसाईड नोट अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना हे रजिस्टर कुणीही दाखवले नव्हते. मात्र, ही बाब लक्षात येताच पोलिसांनी तातडीने ते रजिस्टर जप्त केले. सुसाईड नोट सोशल मीडियावरून वाºयाच्या वेगाने फिरली. मात्र, त्यानंतर तातडीने पोलिसांनी या सुसाईड नोटची सत्यता तपासण्यासाठी आपले काम सुरू केले. या चिठ्ठीतील हस्ताक्षर हे विवेकचेच आहे अथवा नाही, हे तपासण्यासाठी विवेकने ज्या शाळा-कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, तेथील उत्तरपत्रिका हस्तगत करत, त्या उत्तर पत्रिकांतील हस्ताक्षर आणि कथित सुसाईड नोटमधील हस्ताक्षर, याची पडताळणी करण्यासाठी ते हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवले. सुसाइड नोट आणि त्या मुलाचं हस्ताक्षर तपासून पाहण्यात आलं. त्यानंतर ही नोट बनावट असल्याचं समोर आलं. याप्रकरणी अज्ञाताविरोधात बीड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय लिहिलं होतं चिठ्ठीत?

मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे. मी आत्ताच नीट परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी