35 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रपरमबीर सिंग यांच्या पत्नीची करोडोंची माया

परमबीर सिंग यांच्या पत्नीची करोडोंची माया

रसिका जाधव

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्नी सविता परमबीर सिंग या हजारो कोटींच्या मालकीण आहेत. तसेच त्यांच्या अनेक कंपन्या देखील आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते विकास लवांडे यांनी ट्विट केले आहे.

विकास लवांडे यांनी सविता परमबीर सिंह यांच्यावर जे आरोप केले आहेत. त्यांचे त्यांच्याकडे सबळ पुरावे देखील आहेत. विकास लवांडे यांचे म्हणणे आहे की, सविता परमबीर सिंग या हजारो कोटींच्या मालकीण आहेत आणि त्यांच्या अनेक कंपन्या देखील आहेत. त्यांनी त्याच्या ट्विटमध्ये तीन कंपन्याच्या नावाचा उल्लेख देखील केला आहे. इंडिया बुल्स प्रॉपर्टी प्रा.ली., IICHFL पासून श्रेयस होम मॅनजेमेंट प्रा.ली. पर्यंत अशा कंपन्याच्या त्या मालकीण आहेत.

लय भारी सोबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले की, माझी मागणी आहे की, सविता परमबीर सिंग यांची चौकशी करावी. राज्याचे पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (अँटी-करप्शन ब्युरो) ने त्यांची चौकशी करावी. तिच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली आहे. तिचे उत्पन्नाचे साधन काय आहे. तिच्याकडे कोणत्या कंपन्या आहेत त्या कंपनीत काय चालते यांची सगळी चौकशी राज्याचे पोलीस महासंचालक यांनी करावी अशी राष्ट्रवादी प्रवक्ता म्हणून माझी मागणी आहे.

-राष्ट्रवादी प्रवक्ते विकास लवांडे, पुणे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी