31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्ररुपाली ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

रुपाली ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

टीम लय भारी

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पक्षाला मोठा झटका बसला आहे. पुण्यातील मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. रुपाली ठोंबरे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. राज ठाकरे यांना याबाबत लिहिलेल्या पत्रात त्यांनी दिलेल्या बळ आणि प्रेरणेसाठी आभार मानले आहेत. तसंच राज ठाकरे हे नाव कायम ह्रदयात कोरलेलं राहिल, असंही म्हटलं आहे(MNS reaction after the resignation of Rupali Thombre).  

 रुपाली पाटील यांनी राजीनाम्यात काय म्हटलं आहे?

“सप्रेम जय महाराष्ट्र, मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि मा.”श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल. जय महाराष्ट्र,” असं रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना कामे दिली तर हेच होणार, मनसे आमदार राजू पाटील झाले संतप्त

सुप्रिया सुळेंच्या ‘सेल्फी विथ पोटहोल्स’ मोहिमेवरून मनसे नेते संदिप देशपांडेंची टिप्पणी 

रुपाली पाटील कोणत्या पक्षात जाणारचर्चांना उधाण

दरम्यान, रुपाली पाटील यांचा मनसे पक्षांर्गत बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळेच अखेर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आता त्या कोणत्या पक्षात जाणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या रुपाली पाटील ठोंबरे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात असं बोललं जात आहे. रुपाली पाटलांकडूनही लवकरच याबाबत घोषणा करू असं सांगितलं जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पुणे दौरा

दरम्यान, राज ठाकरे यांचा १५ डिसेंबरला पुणे दौरा आहे. ते बुधवारी सकाळी ८ वाजता सुरुवातीला शिवाजीनगर येथील रोकडोबा मंदीर येथे एका पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. यानंतर सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान छत्रपती शिवाजीनगर मतदार संघात असतील. यानंतर ते बॅकवेट हॉल, झाशीची राणी चौक बालगंधर्व येथे दुपारी १२ ते २ या वेळेत असतील. कोथरूड मतदारसंघात सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत ते रत्ना बॅक्वेट हॉल (कर्वेनगर) येथे असतील.

Raj Thackeray : राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, आज नाशिक दौऱ्यादरम्यान साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

https://english.lokmat.com/aurangabad/running-a-newspaper-is-not-a-childs-job-raj-thackeray/

सायंकाळी ६ ते साडेसात या वेळेत राज ठाकरे खडकवासला मतदारसंघात धायरेश्वर हॉल (धायरी) येथे असतील. हडपसर मतदार संघात ते राज बॅक्वेट हॉल (कोंढवा गाव) येथे राहतील.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी