27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्र'सुषमा अंधारे यांचा लवकरच...' मोहित कंबोज यांचा धमकीवजा इशारा

‘सुषमा अंधारे यांचा लवकरच…’ मोहित कंबोज यांचा धमकीवजा इशारा

नाशिक ड्रग्स रॅकेटप्रकरणी शिवसेना उबाठा गटाच्या सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. राज्य सरकारमधील मंत्री दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप करत नार्को टेस्टची मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला बुधवारी, (18 ऑक्टोबर) मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “आता सगळ्यांची तोंडं बंद होणार” असे व्यक्तव्य केले होते. यावर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यातच, आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरवरून, ‘सुषमा अंधारे यांचा लवकरच महुआ मोईत्रा होणार’ असा धमकीवजा इशारा दिला आहे.

नाशिकमधील ड्रग्स रॅकेट उघडकीस आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा घेतला होता. या प्रकरणात राज्य सरकारमधील मंत्री तसेच नाशिक जिल्ल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच, फरार झालेल्या आरोपी ललित पाटील ह्याला फरार होण्यास कोण मदत करत आहे? असा सवाल विचारला त्यांनी विचारला होता. मुंबई पोलिसांनी बुधवारी, (18 ऑक्टोबर) ललित पाटील याला बंगळुरूमधून अटक केली.

ललित पाटीलच्या अटकेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना, “ललित पाटीलच्या अटकेनंतर सर्वांची तोंडे बंद होणार, यातील दोषींवर कारवाई करू” असे म्हंटले होते. सुषमा राऊत यांनी त्यावर पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की, बोलणाऱ्यांची तोंडं बंद होतील. हा इशारा आहे की धमकी आहे? तोंडं बंद कराल म्हणजे काय कराल? संपवून टाकाल का? की मलिक, देशमुख आणि राऊतांना अडकवलं तसं मला अडकवाल? अडकवाल तर कशात अडकवाल? मी आयुष्यभर संवैधानिक भाषा सांगत आली आहे. आयुष्यभर कायदे आणि कलमं याशिवाय काहीही बोललेले नाही. तुम्ही मला अडकवलं तर कशात अडकवाल?”

“देवेंद्र फडणवीस हे विसरत आहेत की, ते एका पक्षाचे नेते नसून ते या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. या राज्यातील प्रत्येक नागरिकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यांचं आणि माझं काही शत्रुत्व आहे असं त्यांना का वाटत आहे?” असा सवाल सुषमा अंधारेंनी केला.

मोहित कंबोज यांचा सुषमा अंधारे यांना धमकीवजा इशारा

या ड्रग्स प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असताना आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी, ‘सुषमा अंधारे यांचा लवकरच महुआ मोईत्रा होणार’ असे ट्विट टाकले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


सुषमा अंधारे यांनीही दिले प्रत्युत्तर

मोहित कंबोज यांच्या ट्विटवर सुषमा अंधारे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करीत त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्राच्या बहिण-लेकीना बिनधास्तपणे धमकावण्याची हिम्मत देवेंद्रजी आपल्या आशीर्वादामुळे येते. मी फडणवीस साहेबांची आभारी आहे.”


काय आहे महुआ मोईत्रा प्रकरण?

महुआ मोईत्रा या तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार असून संसदेतील आक्रमक भाषणशैलीमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. परंतु, त्या आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात चौकशी समिति स्थापन करण्याची तसेच सभागृहातून निलंबित करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा 

आमदार अपात्रतेसंदर्भात २६ ऑक्टोबरला सुनावणी

‘कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणा-यांनी…’, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर पलटवार

‘यांना बुडवण्याची नाही, तुडवण्याची वेळ आलीय’ राऊतांचा सरकारला इशारा

हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांनी याबाबत प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘खासदार महुआ मोईत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर अदानी समूहाबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी करण्यात आला होता.’ त्याच्या प्रतिज्ञापत्रात, त्याने कबूल केले आहे की अदानीला लक्ष्य करणारे प्रश्न विचारण्यासाठी त्याने मोइत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी