30 C
Mumbai
Tuesday, July 2, 2024
Homeमहाराष्ट्रटाळ मृदंगाच्या जयघोषाने नाशिक नगरी दुमदुमली

टाळ मृदंगाच्या जयघोषाने नाशिक नगरी दुमदुमली

डोक्यावर तुळशीवृंदावन, माऊलीचा गजर, विणेकरी-टाळकरींचा अखंड नाद अशा उत्साहपुर्ण वातावरणात रविवारी (दि.४) विविध शहरातून निघालेल्या दिंड्या सातपूरला दाखल झाल्या आहे. वारकऱ्यांच्या अखंड नामस्मरणामुळे सातपूरनगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमली आहे. विविध सामाजिक राजकीय संस्थासह घरोघरी दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे.संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव (पौष वारी) मंगळवारी (दि.६) साजरा होत आहे. त्याअनुषंगाने एक दोन दिवस अगोदरच राम कृष्ण हरी…जय हरी विठ्ठल… असा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या सातपूरनगरीत दाखल झाल्या आहे. आलेल्या वारकऱ्यांचे सातपूर विभागातील अनेक राजकीय, सामाजिक संस्थाकडून स्वागत होत आहे.

डोक्यावर तुळशीवृंदावन, माऊलीचा गजर, विणेकरी-टाळकरींचा अखंड नाद अशा उत्साहपुर्ण वातावरणात रविवारी (दि.४) विविध शहरातून निघालेल्या दिंड्या सातपूरला दाखल झाल्या आहे. वारकऱ्यांच्या अखंड नामस्मरणामुळे सातपूरनगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमली आहे. विविध सामाजिक राजकीय संस्थासह घरोघरी दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे.संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव (पौष वारी) मंगळवारी (दि.६) साजरा होत आहे. त्याअनुषंगाने एक दोन दिवस अगोदरच राम कृष्ण हरी…जय हरी विठ्ठल… असा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या सातपूरनगरीत दाखल झाल्या आहे. आलेल्या वारकऱ्यांचे सातपूर विभागातील अनेक राजकीय, सामाजिक संस्थाकडून स्वागत होत आहे.

महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीने प्रत्येक दिंडीचे स्वागत करण्यात येत आहे. माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते प्रत्येक दिंडीस संत निवृत्तीनाथ महाराज यांची प्रतिमा तसेच शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यासाठी पपया नर्सरी येथे मनोरमा उभरण्यात आला असून महाराष्ट्र वारकरी महामंडळ शहराध्यक्ष ह.भ.प.धनंजय महाराज रहाणे, जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. श्रावण महाराज अहिरे, जिल्हा सचिव ह.भ.प. लहू महाराज अहिरे, सिन्नर तालुका अध्यक्ष ह.भ.प. अरुण महाराज दराडे,जिल्हा कार्याध्यक्ष ह.भ.प. दत्तात्रय महाराज डुकरे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज आहेर,ह.भ.प. सुभाष महाराज बछाव, ह.भ.प. भास्कर महाराज बंदावणे आदी परिश्रम घेत आहे.
दरम्यान, सातपूरला अनेक रहिवाशी भागात दिंड्या मुक्कामी आहे. घरोघरी दिंड्यांचे स्वागत होत असून सकाळी त्र्यंबकेश्वर कडे प्रस्थान करणार आहे.

संत निवृत्तिनाथांच यात्रोत्सव आजपासून रविवार (ता. ४)पासून शुक्रवार (ता. ९)पर्यंत अर्थात नवमी ते चतुर्दशी या कालावधीत होत आहे. निवृत्तिनाथांच्या जन्म सप्तशतकोत्तरी वर्षाचे औचित्य साधून गेल्या वर्षापासूनच वेगवेगळे उपक्रम संस्थानतर्फे हाती घेण्यात आले. यंदाच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तिनाथ समाधी मंदिराच्या दगडी सभामंडपाची पायाभरणी झाली असून, उर्वरित कामही लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे विश्व्स्त मंडळाने सांगितले.
रविवारी पहाटे पाचला काकडा पूजनाने व नित्य आरतीने उत्सवाला सुरवात होत आहे. सकाळी सातपासून सायंकाळी सातपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागांतून येणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांचे, संत-महंतांचे स्वागत निवृत्तिनाथ संस्थानतर्फे करण्यात येणार आहे. या कालावधीत सायंकाळी सात ते रात्री आठ हरिपाठ, तसेच आठ ते दहापर्यंत परंपरेची कीर्तनसेवा पार पडेल. मंगळवारी (ता. ६) पहाटे चारला संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीची शासकीय महापूजा होणार आहे. दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत यात्रोत्सवाच्या परंपरेप्रमाणे संत निवृत्तिनाथांच्या रथाची नगरप्रदक्षिणा होईल. ज्योतिर्लिंग त्र्यंबकराज व संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ भेट परंपरेप्रमाणे होईल.याचवेळी तीर्थराज कुशावर्त येथे नाथांच्या पादुकांवर जलाभिषेक करण्यात येईल. गुरुवारी (ता. ८) काल्याचे कीर्तन होणार आहे. याच दिवशी संस्थानतर्फे आलेल्या दिंड्या-पालख्यांना मानाचा नारळ प्रसाद देण्यात येईल. शुक्रवारी (ता. ९) चतुर्दशीच्या दिवशी प्रक्षालन पूजेने निवृत्तिनाथ यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
हा यात्रोत्सव निर्विघ्न पार पाडावा, असे आवाहन निवृत्तिनाथ संस्थानतर्फे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव सोमनाथ घोटेकर, प्रसिद्धीप्रमुख तथा विश्वस्त अमर ठोंबरे, पालखीप्रमुख नारायण मुठाळ, विश्वस्त माधवदास महाराज राठी, श्रीपाद महाराज कुलकर्णी, राहुल महाराज साळुंखे, नवनाथ महाराज गांगुर्डे, जयंत गोसावी, योगेश गोसावी, तसेच कांचनताई जगताप आदींनी केले आहे.

प्रशासनाचे नियोजन
पौषवारीनिमित्त रमेश महाराज, मोहन महाराज, बाळासाहेब महाराज, रामकृष्ण महाराज यांच्या कीर्तनसेवा होतील. गुरुवारी काल्याच्या कीर्तनाने समाप्ती होईल. पौषवारीसाठी त्र्यंबक पालिका, तसेच पोलिस प्रशासन यांनी यापूर्वी निवृत्तिनाथ संस्थानच्या विश्वस्त मंडळाशी चर्चा, बैठका व विचारविनिमय करण्यात आला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी