32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक मनपाच्या पुष्पोत्सवाचा समारोप

नाशिक मनपाच्या पुष्पोत्सवाचा समारोप

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पुष्पोत्सव २०२४ कार्यक्रमाच्या समारोप;प्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी सांगितले की नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पुष्पोत्सवास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. गतवर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी स्टॉलची संख्या वाढलेली असून मोठ्या प्रमाणात विविध स्पर्धांमध्ये प्रवेशिकांमध्येही उत्स्फूर्तपणे नागरिकांनी व फुल उत्पादकांनी सहभाग नोंदवीलेला आहे तसेच या पुष्पप्रदर्शनाला जास्तीत जास्त नाशिककरांनी भेट दिली त्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चित्रपट कलावंत किरण गायकवाड या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की नाशिकच्या पुष्पोत्सवा मुळे झाडांची वेगळी माहिती मला मिळाली तसेच या प्रदर्शनात विविध कलाकारांना एक चांगले व्यासपीठ निर्माण करून देऊन वारली पेंटिंग सारख्या कलेच्या प्रेमात मी आज पडलो असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात बोलताना चित्रपट कलावंत शिवानी बावकर यांनी सांगितले की नाशिक महानगरपालिकेच्या या पुष्पोत्सवामुळे माझी व माझ्या फुलासारख्या प्रेक्षकांची भेट घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण योगदान नाशिक महानगरपालिकेने पुष्पोत्सवाच्या निमित्ताने केले आहे नाशिकचा तसा माझा परिचय जुना आहे लहानपणीचे नाशिक आणि आजचे नाशिक या फार मोठ्या बदल झालेला आहे.अलीकडचे नाशिक हे मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला झालेले दिसते त्यात नाशिक महापालिकेचा मोठा वाटा आहे. या कार्यक्रमातून पुष्पोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धांमध्ये पारितोषिक ज्यांना मिळाले त्यामागे त्यांची मेहनत मोठी आहे. यावेळी त्यांनी पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन केले यावेळी त्यांनी
-लाखात एक माझा फौजी
-फौजीची बायको दहा लाखात एक असते
या दोन डायलॉगनी सर्व उपस्थितांना मोहित करून टाकले

विजेत्या स्पर्धकांना आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली यावेळी व्यासपीठावर उपायुक्त श्रीकांत पवार उद्यान अधीक्षक विवेक भदाणे उद्यान विभागातील सर्व निरीक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले तीन दिवसात पुष्पोत्सव 2024 ला नाशिककर पुष्प प्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल उद्यान विभागाच्या वतीने विवेक भदाणे यांनी नाशिककरांचे आभार मानले पुढील वर्षी मोठ्या उत्साहात पुष्पोत्सव २०२५ चे आयोजन केले जाईल असे देखील विवेक भदाणे यांनी समारोपाच्या वेळी मनोगत व्यक्त केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी