31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये गोदारती होणारच : रामतीर्थ गोदावरी समितीचा निर्धार

नाशिकमध्ये गोदारती होणारच : रामतीर्थ गोदावरी समितीचा निर्धार

गोदावरी महाआरती वरून साधू महंतांनी लाठ्याकाठ्या काढण्याची भाषा केल्यानंतर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेत आपि भूमिका स्पष्ट करत महाआरती होणारच असल्याचे स्पष्ट केले. तसेच, साधू महंतांनी लाथाकाठ्या काढल्या तर त्या आम्ही प्रसादरूपी स्वीकारणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ग्रामसभेत झालेल्या विरोधाची हवा एकप्रकारे काढून टाकण्यात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीला यश आल्याचे दिसत आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने गोदावरी महाआरती करण्यासाठी जवळपास ११ कोटी ६६ लाखांचा निधी दिला आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची स्थापना करण्यात आली होती.

गोदावरी महाआरती वरून साधू महंतांनी लाठ्याकाठ्या काढण्याची भाषा केल्यानंतर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेत आपि भूमिका स्पष्ट करत महाआरती होणारच असल्याचे स्पष्ट केले. तसेच, साधू महंतांनी लाथाकाठ्या काढल्या तर त्या आम्ही प्रसादरूपी स्वीकारणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ग्रामसभेत झालेल्या विरोधाची हवा एकप्रकारे काढून टाकण्यात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीला यश आल्याचे दिसत आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने गोदावरी महाआरती करण्यासाठी जवळपास ११ कोटी ६६ लाखांचा निधी दिला आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची स्थापना करण्यात आली होती.त्यामध्ये पुरोहित संघाच्या सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते यांना स्थान देण्यात आले होते. मात्र, पुरोहित संघाने आमच्या हक्कांवर गदा येणार असल्याचे सांगत या समितीला विरोध करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी एका ग्रामसभेचे आयोजन करून त्यामध्ये साधू महंतांनी लाठ्याकाठ्या घेऊन रस्त्यावर उतरण्याची भाषा केली होती.

याबाबत १४ रोजी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करून आपली भूमिका स्पष्ट केली. समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी सांगितले कि, आजही आम्ही कोणाच्याही हक्कांवर गदा आणत नसून लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरविला जात आहे. सर्वानी मिळून गोदावरी मातेची आरती करावी हाच आमचा उद्देश आहे. तसेच, साधू महंत लाठ्याकाठ्या घेऊन आल्यास त्या प्रसादरूपी स्वीकारणार असल्याचे सांगितले. तसेच, राज्य सरकारने दिलेला निधी इतर कामांसाठी असून गोदावरी आरतीसाठी नसल्याचे स्पष्ट केले. राज्य सरकारने जरी निधी देऊ केला तरी तो आम्ही स्वीकारणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

या पत्रकार परिषदेला रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष नृसिंहकृपा दास, सचिव मुकुंद खोचे, कोषाध्यक्ष अशिमा केला, डॉ. अंजली वेखंडे, प्रफुल्ल संचेती, राजेंद्र फड, चिराग पाटील, शिवाजी बोदार्डे हे उपस्थित होते.

ग्रामसभेत रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सदस्य चंद्रशेखर पंचाक्षरी आणि प्रतीक शुक्ल यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याबाबत विचारले असता गायधनी यांनी त्यांनी आपला राजीनामा सोशल मीडियाद्वारे पाठवला आहे. आणि सोशल मीडियाद्वारे राजीनामा स्वीकारण्याचे कुठलेही प्रावधान नसल्याचे सांगत अदयाप पर्यंत लेखी राजीनामा आपल्यापर्यंत आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुरोहित संघाच्या सदस्यांच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे.

ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा बोलावली जाते त्यामुळे महानगर पालिका क्षेत्रात ग्रामसभा कशी बोलावता येऊ शकते यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच. यावरून सुरु असलेल्या राजकारणाशी समितीचा कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

गेल्या अनेक वर्षांपासून ज्या संस्थेचे ऑडिट झालेले नाही अशा संस्थेकडे पैशांचा व्यवहार कसा दिला जाऊ शकतो असे सांगत गायधनी यांनी हा सर्व खेळ पैशांसाठी सुरु असल्याचा थेट आरोप केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अंदर कि बात बाहेर आली असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी