36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2022 : आशिया चषकात पुन्हा श्रीलंकेची बाजी, पाकिस्तानची पुरती जिरली

Asia Cup 2022 : आशिया चषकात पुन्हा श्रीलंकेची बाजी, पाकिस्तानची पुरती जिरली

आशिया चषक 2022 स्पर्धेत श्रीलंकेची निराशाजनक सुरवात झाली कारण अफगाणिस्तान संघाकडून श्रीलंकेला पहिल्यांदा पराभव पत्करावा लागला, परंतु तरी सुद्धा निराश न होता मोठी उसळी मारून श्रीलंकेने सगळ्यांनी आपली उत्कृष्ट खेळी दाखवून दिली.

यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान संघाला धूळ चारत श्रीलंकेने यावेळी सुद्धा विजयी पताका फडकवली आहे. यावेळी भानुका राजपक्षेची उत्कृष्ट फलंदाजी आणि प्रमोद मधुशनची उत्कृष्ट गोलंदाजी या दोन गोष्टी संघाला चांगल्याच फायदेशीर ठरल्या. पाकिस्तानची खेळी सरस असून सुद्धा श्रीलंकेने यावेळी उत्कृष्ट खेळी करत पाकिस्तानला दणका दिला. आशिया कप 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान वि श्रीलंका असा सामना खेळण्यात आला. यावेळी श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत सहाव्यांदा आशियाचा चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला आहे. साधारण 2012 नंतर पाकिस्तानला आशिया चषक जिंकण्याची सुवर्णसंधी चालून आली होती परंतु अखेरीस संघाला अपयश आले.

आशिया चषकातील अंतिम सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात चुरस लागली होती, त्यामुळे या खेळात कोणाला विजेतेपद मिळणार म्हणून सगळ्यांचीच उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. या अंतिम सामन्यात खेळताना भानुका राजपक्षेच्या नाबाद 71 धावांच्या जोरावर 6 बाद 171 धावा श्रीलंकेने केल्या, तर त्याच्या वरचढ ठरण्याच्या नादात पाकिस्तान 20 षटकांत 10 गडी गमावून अवघ्या 147 धावाच करू शकला, त्यामुळे हा सामना श्रीलंकेला सहजच जिंकता आला.

हे सुद्धा वाचा…

Officer : प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे खूप मोठी ताकद असते – डॉ. सचिन मोटे

Queen Elizabeth : राजवाडयात जन्म घेऊनही राणी एलिझाबेथच्या पतवंडाना राजकीय वारसा मिळालेला नाही

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला पैसे देऊ गर्दी जमवण्याचा सरकारचा प्रयत्न – अंबादास दानवे

श्रीलंकेने पाकिस्तान संघाला 171 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने चांगली सुरवात केली परंतु अपेक्षेच्या काहीतरी उलट घडू लागले. कर्णधार बाबर आझम याने 5 धावा करून डाव गुंडाळला, तर फखर जमान सुद्धा शून्य धावांवर बाद झाला त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या. प्रमोद मधुशन या एकट्या वीराने दोघांचे विकेट घेतले. तरीसुद्धा रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांनी संघाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यावेळी 31 चेंडूत 32 धावा करून इफ्तिखार मधुशन बाहेर पडला, यानंतर नवाज 9 चेंडूत 6 धावा काढून तो सुद्धा आऊट झाला.

खेळाडूंचे भराभर बळी जात असताना पाकिस्तान संघाच्या गोटात हुरहुर सुरूच होती. शेवटच्या शतकात पाकिस्तानसमोर 5 षटकात 70 धावांचे आव्हान होते. 16 व्या षटकात वेगवान गोलंदाज चमिका करणारत्नेने 9 धावा दिल्या आणि नवाजची विकेट घेतली. 17 वे षटक लेगस्पिनर वनिंदू हसरंगाने टाकले आणि 3 बळी घेतले, त्याने पहिल्याच चेंडूवर रिझवानला बाद केले, त्याने 49 चेंडूत 55 धावा केल्या. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आसिफ अली शून्यावर बाद झाला. खुशदिल शाह 5व्या चेंडूवर 2 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. हसरंगाने त्याच्या 4 षटकात 27 धावा देत 3 बळी घेतले.

पाकिस्तानला शेवटच्या 5 षटकात 70 धावा करायच्या होत्या आणि 7 विकेट्स हातात होत्या. 16व्या षटकात वेगवान गोलंदाज चमिका करुणारत्नेने केवळ 9 धावा दिल्या आणि नवाजची विकेटही घेतली. 17 वे षटक लेगस्पिनर वनिंदू हसरंगाने टाकले आणि 3 बळी घेतले. त्याने पहिल्याच चेंडूवर रिझवानला बाद केले. त्याने 49 चेंडूत 55 धावा केल्या. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आसिफ अली शून्यावर बाद झाला. खुशदिल शाह 5व्या चेंडूवर 2 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. हसरंगाने त्याच्या 4 षटकात 27 धावा देत 3 बळी घेतले.

आशिया चषक 2022 स्पर्धेत श्रीलंकेची निराशाजनक सुरवात झाली कारण अफगाणिस्तान संघाकडून श्रीलंकेला पहिल्यांदा पराभव पत्करावा लागला, परंतु तरी सुद्धा निराश न होता मोठी उसळी मारून श्रीलंकेने सगळ्यांनी आपली उत्कृष्ट खेळी दाखवून दिली. सहाव्यांदा विजेतेपद जिंकून श्रीलंकेने क्रिकेट जगतात पुन्हा आपले नाव मोठे केले आहे. दरम्यान या आशिया चषक स्पर्धेत भारताने 7 वेळा जिंकले आहे तर श्रीलंकेने 6 वेळा या स्पर्धेत आपली चुणूक दाखवली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी