26 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांचे निधन, वारकरी सांप्रदायावर शोककळा

ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांचे निधन, वारकरी सांप्रदायावर शोककळा

टीम लय भारी

शेगाव : वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य निवृत्ती महाराज वक्ते यांचे शेगावजवळील टाकळी या मुळगावी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१६ -१७ या वर्षाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह़ भ़ प़ निवृत्ती महाराज वक्ते यांना देण्यात आला होता.

निवृत्ती महाराज यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावलेली होती. उपचार सुरु असतानाच त्यांची आज प्राणज्योत मालवली.

निवृत्ती महाराज वक्ते यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९३४ रोजी बुलढाणा येथे वारकरी कुटुंबात झाला. वयाच्या ९ व्या वर्षांपासून त्यांनी कुटुंबियांबरोबर मुक्ताबाई आणि पंढरीची वारी सुरु केली. बालवयातच अडीच हजार अभंगांचे पठण त्यांनी केले होते. साखरे महाराज मठात निलकंठ प्रभाकर मोडक यांच्या कडे त्यांनी अध्ययन केले. पुढील काळात ह़ भ़ प़ परभणीकर गुरुजी, भगवान शास्त्री धारुरकर, गोपाळ शास्त्री गोरे, एकनाथ महाराज देगलूरकर आदि संत महात्मांच्या मार्गदर्शनाखाली प्राकृत प्रस्थानत्रयी धर्मशास्त्र, स्मृती ग्रंथ पुराण इत्यादी ग्रंथांचा पंढरपूर येथे अभ्यास केला.

विठ्ठल कवच, विठ्ठल सहस्त्रणाम, विठ्ठल स्तवराज, विठ्ठल अष्टोत्तरनाम, ज्ञानेश्वर दिग्विजय, वाल्मिकी रामायण, संत तुकाराम महाराज सदैह वैकुंठ गमन अशा अनेक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले़ त्यांनी कीर्तन, प्रवचनाद्वारे अखंडपणे मानवतावादी सेवा केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो साधकांनी धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी