29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिर्डीत हनुमान जन्मोत्सवानिमित्त वीस तरुणांनी उचलला सव्वाशे किलोचा बजरंग गोटा

शिर्डीत हनुमान जन्मोत्सवानिमित्त वीस तरुणांनी उचलला सव्वाशे किलोचा बजरंग गोटा

शहरात क्रांती युवक मंडळ आयोजित हनुमान जन्मोत्सव उत्सव समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिणमुखी हनुमान मंदीरात हनुमान जन्मोत्सव निमित्ताने बजरंग बोटा उचलणे स्पर्धा, हनुमान याग महाआरती,चांदीची गदा पूजन, महाप्रसाद वाटप यांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विकास सोसायटी चेअरमन विलास कोते, दीपक वारुळे, अर्जुन जगताप, मधुकर कोते, किशोर गंगवाल, दत्तू गोंदकर, विजय गोंदकर, रमेश वाघचौरे आदी मान्यवरांच्या हस्ते बजरंग गोट्याचे विधिवत पूजन करून स्पर्धेला सुरवात करण्यात आली. शहरातील तरुणांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग नोंदवत हनुमान जयंती निमित्त शक्तीची उपासना केली.

शहरात क्रांती युवक मंडळ आयोजित हनुमान जन्मोत्सव उत्सव समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिणमुखी हनुमान मंदीरात हनुमान जन्मोत्सव निमित्ताने बजरंग बोटा (Bajrang Gotha ) उचलणे स्पर्धा, हनुमान याग महाआरती,चांदीची गदा पूजन, महाप्रसाद वाटप यांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विकास सोसायटी चेअरमन विलास कोते, दीपक वारुळे, अर्जुन जगताप, मधुकर कोते, किशोर गंगवाल, दत्तू गोंदकर, विजय गोंदकर, रमेश वाघचौरे आदी मान्यवरांच्या हस्ते बजरंग गोट्याचे विधिवत पूजन करून स्पर्धेला सुरवात करण्यात आली. शहरातील तरुणांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग नोंदवत हनुमान जयंती निमित्त शक्तीची उपासना केली.
(200 youths lift 125 kg Bajrang Gotha on Hanuman Jayanti in Shirdi)

१२५ किलोचा बजरंग गोटा उचलण्याच्या स्पर्धेत ५० तरुणांनी सहभाग घेतला. यातील २० तरुणांनी बजरंग गोटा यशस्वीरित्या उचलला. यामध्ये सचिन तांबे, प्रशांत गोंदकर, सुरेश सुपेकर, राजेंद्र पांचाळ, समाधान बनकर, सोपान त्रिभुवन, सागर बेलदार, सुदर्शन वेरणेकर, अमोल रोकडे, यश चित्ते, अभिजीत बनकर तसेच आदींनी सहभाग घेतला. यशस्वी स्पर्धकांचा सत्कार भाजपा अध्यक्ष सचिन शिंदे, विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र महाले, युवा मोर्चाचे चेतन कोते, तानाजी गोंदकर, मणिलाल पटेल, दीपक रमेश गोंदकर यांनी केला. तसेच हनुमान यागाचे आयोजन करण्यात आले होते. सदर याग करण्यासाठी विजय गोंदकर,किशोर कोठारी, वीरेश जयस्वाल यांनी विशेष परिश्रम घेतले. क्रांती युवक मंडळाच्या माध्यमातून तरुणांच्या निर्व्यसनतेचे प्रतीक असलेल्या चांदीच्या गधेचे पूजन हनुमान मंदिरात करण्यात आले.

कार्यक्रमासाठी आकाश त्रिपाठी, दत्तू झाकणे, बबलू कोळकर, आकाश वाडेकर, शुभम नानेकर, किरण परदेशी, गणेश मिसाळ, आदित्य वारुळे, आर्यन तेजी, सार्थक झाकणे आदींनी परिश्रम घेतले. सचिन तांबे, क्रांती युवक मंडळ, माजी विश्वस्त, साई संस्थान- गेल्या २० वर्षांपासून आम्ही हनुमान जन्मोत्सवाच्या निमीत्ताने १२५ किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा आयोजित करतो. सुरवातीला फक्त २ तरुण हा गोटा उचलत परंतु आता २० तरुण गोटा उचलून शक्तीची उपासना करतात. तरुणांना वाईट कामापासून दूर ठेवण्यासाठी तरुणांच्या निर्व्यसनतेचे प्रतीक म्हणून चांदीच्या गधेचे पूजन करतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी