29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रस्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही त्रंबकेश्वरमध्ये जातीनिहाय पंगत

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही त्रंबकेश्वरमध्ये जातीनिहाय पंगत

त्र्यंबकेश्वर येथील गावजेवणात एक पंगत विशिष्ट जातीचे लोक व त्यांच्या कुटुंबियांची होते. तर इतर बहुजनांसाठी वेगळी पंगत होते. ही पद्धत माणसामाणसात भेदभाव करणारी असून,सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी आहे. स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही असा प्रकार सुरु असणे दुर्देवी असून ही पद्धत बंद व्हावी,अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्र्यंबकेश्वर तहसीलदाराकडे केली आहे. तहसीलदाराना दिलेल्या पत्रात अनेक वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टतर्फे दरवर्षी गाव जेवण आयोजित केले जाते. दरवर्षी चैत्र किंवा वैशाख महिन्यात ग्रामदेवतांची काही धार्मिक कर्मकांडे केल्यावर ही जेवणावळ आयोजित केली जाते.त्यासाठी संपूर्ण गावातून लोक वर्गणी तसेच वस्तू रुपात खाद्यसामग्री गोळा केली जाते.

त्र्यंबकेश्वर येथील गावजेवणात एक पंगत विशिष्ट जातीचे लोक व त्यांच्या कुटुंबियांची होते. तर इतर बहुजनांसाठी वेगळी पंगत ( Caste based paralysis) होते. ही पद्धत माणसामाणसात भेदभाव करणारी असून,सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी आहे. स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही असा प्रकार सुरु असणे दुर्देवी असून ही पद्धत बंद व्हावी,अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्र्यंबकेश्वर तहसीलदाराकडे केली आहे. तहसीलदाराना दिलेल्या पत्रात अनेक वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टतर्फे दरवर्षी गाव जेवण आयोजित केले जाते. दरवर्षी चैत्र किंवा वैशाख महिन्यात ग्रामदेवतांची काही धार्मिक कर्मकांडे केल्यावर ही जेवणावळ आयोजित केली जाते.त्यासाठी संपूर्ण गावातून लोक वर्गणी तसेच वस्तू रुपात खाद्यसामग्री गोळा केली जाते.(Even after 77 years of Independence, caste-based paralysis in Trimbakeshwar)

गावजेवण असल्याने त्र्यंबकेश्वर गावातील सर्वच सामाजिक स्तरातील जवळपास सर्वच लोक इथे जेवणासाठी येतात. मात्र ह्या गावोत्सवात एका विशिष्ट जातीचे लोक व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी स्वतंत्रपणे अन्न शिजवले जाते व त्यांची जेवणाची पंगत सुद्धा इतर बहुजन समाज घटकांपासून वेगळी बसते. महादेवी ट्रस्ट कडून सार्वजनिक भोजनाच्या ठिकाणी असा संतापजनक व मानवतेला कलंक असणारा जातीभेदाचा प्रकार राजरोसपणे येथे वर्षांनुवर्षे घडतो , असे तेथील काही स्थानिक लोकांनी महाराष्ट्र अंनिसच्या लक्षात आणून दिले. जर संबंधित महादेवी ट्रस्ट कडून असा जातीभेद व पंगतीभेद होत असेल तर ही घटना या देशाच्या राज्यघटनेचे उल्लंघन करणारी तर आहेच, शिवाय बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून मानले गेलेल्या त्र्यंबकेश्वर गावाला श्रद्धेपोटी येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेशी केलेली ती गंभीर प्रतारणा आहे, असे महाराष्ट्र अंनिसचे मत आहे. सोमवार दिनांक २९ एप्रिल,रोजी या महादेवी ट्रस्ट कडून गावजेवणाचा कार्यक्रम होणार असल्याचे समजते आहे. जर सर्व गावाकडून लोक वर्गणी जमा करून
गावजेवण दिले जात असेल तर,तेथे कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता सर्वांसाठी एकाच वेळी अन्न शिजवले जाईल व सर्व गावकरी एकत्रितपणे पंक्तीत बसून जेवण करतील, असे आपण आजच संबंधितांना बोलावून घेऊन, लेखी पत्राद्वारे समज देण्याची मागणी अंनिसने तहसिलदार त्र्यंबकेश्वर यांचेकडे केली आहे.

त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टने धार्मिक प्रथा-
परंपरेच्या नावाने हा सामाजिक विषमतेचा व जातीभेदाला खतपाणी घालणारा अनिष्ट ,अमानवीय आणि राज्यघटनेचे उल्लंघन करणारा प्रकार चालूच ठेवण्याचा अट्टाहास केला,आग्रह धरला तर संबंधितांवर आपण कायदेशीर कारवाई करावी,अशी विनंती अंनिसच्या वतीने करण्यात आली आहे. मागील वर्षी अंनिस व प्रशासनाच्या प्रयत्नाने एकच पंगत झाली होती.परंतु तरीही या वर्षी पंगत वेगवेगळी पंगत बसण्याचा घाट घातला जाण्याची शक्यता असल्याने अंनिसने निवेदन दिले आहे. निवेदनावर राज्य प्रधान सचिव, डॉ. ठकसेन गोराणे,राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे,कार्याध्यक्ष त्र्यंबकेश्वर संजय हराळे, प्रधान सचिव,त्र्यंबकेश्वर दिलीप काळे,जिल्हा कार्याध्यक्ष डाॅ शामसुंदर झळके,जिल्हा प्रधान सचिव नितीन बागुल यांच्या सह्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी