30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeक्राईमनाशिक जेलरोड येथील महिलेला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पुण्यातून अटक

नाशिक जेलरोड येथील महिलेला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पुण्यातून अटक

जेलरोड परिसरातील मोरे मळ्यात क्षुल्लक कारणावरून महिलेला घरात कोंडून बाहेरून आग लावली आणि महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला पुण्याच्या हिंजेवाडीतून अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे. निखिल उर्फ स्वप्निल संजय बोराडे (२३, रा. पिंपळपट्टी रोड, बोराळे मळा, जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. कल्याणी मोरे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित निखील याने शुक्रवारी  रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास तक्रार केल्याचा राग मनात ठेवून कल्याणी यांना घरात कोंडून घराच्या खिडकी, दरवाजास आग लावली होती.

जेलरोड परिसरातील मोरे मळ्यात क्षुल्लक कारणावरून महिलेला घरात कोंडून बाहेरून आग लावली आणि महिलेस जिवंत जाळण्याचा ( Burn woman to death) प्रयत्न करणाऱ्या संशयिताला पुण्याच्या हिंजेवाडीतून अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे. निखिल उर्फ स्वप्निल संजय बोराडे (२३, रा. पिंपळपट्टी रोड, बोराळे मळा, जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. कल्याणी मोरे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित निखील याने शुक्रवारी  रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास तक्रार केल्याचा राग मनात ठेवून कल्याणी यांना घरात कोंडून घराच्या खिडकी, दरवाजास आग लावली होती.(Man arrested from Pune for trying to burn woman to death in Nashik jail road)

तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र संशयित निखिल सदरच्या घटनेनंतर पसार झाला होता. शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस नाईक मिलीदंसिंग परदेशी यांना संशयित निखील पुण्यातील हिंजवडी लपून असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने हिंजवडीत सापळा रचून निखीलला ताब्यात घेतले.
अधिक तपासासाठी नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक सुगन साबरे, हवालदार महेश साळुंके, नाइक परदेशी, अंमलदार राहुल पालखेडे, चालक समाधान पवार यांनी बजावली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी