28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसिटीलिंकच्या गलथान कारभारा बाबत भाजयुमो चे निवेदन

सिटीलिंकच्या गलथान कारभारा बाबत भाजयुमो चे निवेदन

सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरवासीय बर्‍याच दिवसांपासून अडचणींचा सामना करीत आहेत. या संप काळातील विद्यार्थी पासची रक्कम परत मिळावी व बससेवा पूर्वपदावर यावी या मागण्यांबाबत आज भाजयुमो तर्फे नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना निवेदन देण्यात आले. नाशिक शहरात मागील ६ दिवसांपासून नाशिक महानगर पालिकेची सिटीलिंक अर्थात नाशिक नाशिक महानगर परिवहन महामंडळाची शहर बससेवा कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुन्हाएकदा ठप्प झालेली आहे. सध्या शहरात १२ वी तसेच अनेक विद्यापीठांच्या पदवीधर परीक्षा सुरू असून सर्वत्र परीक्षाकाळाचे वातावरण आहे. संपामुळे अनेक विद्यार्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी हे शहरात महाविद्यालयात येतात, हे सर्व विद्यार्थी सिटीलिंक बसनेच प्रवास करत असल्याने त्यांना सुध्दा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अनेक विद्यार्थांनी सिटीलिंक बसचे मासिक पास काढलेले आहेत, संपामुळे पाससाठी भरलेले पैसे देखील वाया जात आहेत. याशिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून विद्यार्थांना रिक्षा, टॅक्सीने प्रवास करावा लागत असून जादा पैसे मोजावे लागत आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
नाशिक शहरात या संपाची ही पहिलीच वेळ नसून सिटीलिंक बससेवेच्या कर्मचाऱ्यांचा मागील २ वर्षांमधील हा ९ वा संप आहे. प्रत्येक वेळेस सर्वाधिक हाल हे विद्यार्थांचेच होत आहे. या संपामुळे आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास देखील होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.

तरी सदर संप काळात विद्यार्थ्यांची वाया गेलेली रक्कम तात्काळ परत मिळावी तसेच सिटीलिंकची बससेवा पूर्वपदावर यावी अशी मागणी भाजयुमो ने निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री. प्रशांत जाधव, सरचिटणीस श्री. नाना शिलेदार, भाजयुमोचे शहराध्यक्ष श्री. सागर शेलार, सरचिटणीस श्री. प्रशांत वाघ, अमोल पाटील, बापू ढापसे, द्वारका मंडल अध्यक्ष ऋषिकेश शिरसाठ, भाविक तोरवणे, विद्यार्थी संयोजक राज चव्हाण, विकी एकंडे, वैभव दराडे, अक्षत एकंडे, मानस बाक्षे, ओमकार सानप, विजय डोईफोडे मोठ्या संख्येने विद्यार्थी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी