29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपा नोकर भरतीचा बार उडणार नउ हजार पदांचा आकृतीबंध सादर

नाशिक मनपा नोकर भरतीचा बार उडणार नउ हजार पदांचा आकृतीबंध सादर

शहराचा दिवसेंदिवस होत असलेला विस्तार आणि पंचवीस वर्षापासून न झालेली नोकर भरती यामुळे महापालिका प्रशासनाला दैनंदिन कामे करताना नाकेनउ येत आहे. व कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून नोकर भरतीसाठी जोरदार हालचाली सुरु होत्या. याकरिता 49 विभागातील रिक्त पदांचा आकृतीबंध जमा करुन तो एकत्रित केल्यानंतर एकुण 9 हजार 116 पदांचा सुधारित आकृतीबंध महासभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला. या आकृतीबंधात पालिकेत 7 हजार 725 पदांची संख्या मंजूर असून त्यात आवश्यक असलेली नवीने 1 हजार 953 पदांची संख्या वाढवत एकुण 9 हजार 16 पदांचा आकृतीबंध तयार केला आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.29) महासभा झाली. यावेळी नोकर भरतीचा सुधारित नउ हजार पदांचा आकृतीबंध सादर करण्यात आला. दरम्यान महासभेत आकृतीबंध सादर करण्याच्या दुष्टीने महापालिका आयुक्तांनी महत्वपूर्ण बैठक बोलावत सर्व विभागांचा आढावा घेतला होता.यापूर्वी महानगरपालिकेने 2017 साली भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाकडे 14 हजार रिक्त जागांचा आकृतीबंध मंजुरीसाठी पाठवलेला होता. परंतु महापालिकेने पाठविलेल्या आकृतीबंधात अनेक त्रुटी आढळल्या. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती केल्यावर पालिकेवर ताण वाढेल. आणि उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी स्थिती निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे शासनाने हा आकृतीबंध पुन्हा महापालिकेला पाठवत त्रुटी दूर करुन नव्याने सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अखेर प्रशासनाने गुरुवारी नउ हजार पदांचा आकृतीबंध सादर केल्याने रखडलेल्या नोकर भरतीला गती येणार आहे. महापालिकेची हद्द दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. शहरवासियांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी वाढली आहे. पालिकेतून महिन्याला अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत आहेत. महानगरपालिकेच्या जवळपास साडे सात हजार कर्मचाऱ्यांपैकी आज मितीस तीन ते चार हजारांच्या आसपास कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे नाशिककरांना उपलब्ध मनुष्यबळात सोयीसुविधा देताना महापालिकेवरील ताण वाढला आहे. तसेच कामकाजावर परिणाम होत आहे. गुरुवारी 49 विभागातील विविध पदांचा आकृतीबंध ठेवल्यानंत्तर लवकरच तो शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठवला जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शासन या आकृतीबंधावर निर्णय घेइल, का याकडे नजरा लागलेल्या आहेत. पालिका प्रशासनाने प्रत्येक विभागातील रिक्त जागांची माहिती घेउन सुधारित आकृतीबंध तयार केला आहे. त्यामुळे याकरिता कालवधी लागला.दरम्यान यामुळे आता तरी नोकर भरतीला चाल मिळ्नार का ? हे पहावे लागणार आहे.

652 पदांना कायमची कात्री

दरम्यान महासभेच्या मंजुरीकरिता ठेवलेल्या आकृतिबंधातून तब्बल 652 पदे कायमचे रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही पदे कालबाह्य झाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला. दरम्यान 652 पैकी ड वर्गवारीतील 561 तर क मधील 99 पदे होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी