स्मार्ट सिटी कंपनीमार्फत बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र येथे रॉ वॉटर पाईप लाईन तसेच ६०० मीमी व्यासाचे पवन नगर रायझिंग मेनचे कनेक्शन जोडणी इ. कामे करण्याचे नियोजन आहे. ही कामे करणेसाठी गंगापूर डॅम पंपींग स्टेशन येथील ओ साईडचे पंपींग बंद ठेवावे लागणार आहे. यामुळे गंगापूर डॅम पंपींग स्टेशन येथून १) बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र २) पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र ३) निलगिरी बाग जलशुध्दीकरण केंद्र ४) गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र ५) नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथे होणारा पाणी पुरवठा दि. ०२/०३/२०२४ रोजी बंद राहणार आहे.
तरी शनिवार दि. ०२/०३/२०२४ रोजी बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिकरोड येथून होणारा पाणी पुरवठा संपूर्ण दिवस बंद राहील. तसेच रविवार दि. ०३/०३/२०२४ रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी प्रमाणात कमी दाबाने होईल. तसेच विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र व शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसेच खालील परिसरात पाणी पुरवठा होणार नाही.
१. नाशिक पुर्व विभाग प्र.क्र. १४, भागश: १५, भागश: व प्र.क्र. १६, २३ संपुर्ण
२. नाशिक पश्चि विभाग प्र.क्र. ७ भागश:,१२ भागश: आणि प्र.क्र १३ संपुर्ण
३. संपुर्ण पंचवटी विभाग प्र. क्र. १ ते ६
४. संपुर्ण नाशिकरोड विभाग प्र क्र. १७,१८,१९,२०,२१ व २२
५. नविन नाशिक विभाग प्र.क्र २४ भागश:,२५ भागश:,२८ भागश:,२९ भागश:
सकाळचा पाणी पुरवठा,- हेडगेवार चौक दत्त मंदीर परिसर व फलॅट सिस्टीम, पवन नगर टाकी सकाळी सप्लाय परिसर – शुभम पार्क, रामेश्वर नगर, बनदवणे नगर , महेश बँक , रायगड चौक , लोकमान्य नगर, तोरणा नगर, आदर्श नगर, गणपती मंदिर पवन नगर,
पवन नगर टाकी दुपारचा पाणी पुरवठा- शुभम पार्क , राजरत्न नगर, महाकाली चौक , मर्चंट बँक, उंटवाडी विभाग , तिडके नगर, जगताप नगर, कालिका पार्क ,