28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाकडून शहरातील मृत जनावरे उचलण्याची सोय

नाशिक मनपाकडून शहरातील मृत जनावरे उचलण्याची सोय

विविध कारणांनी नाशिक शहरात मृत होणार्‍या जनावरांना तेथून उचलून त्यांची विल्हेवाट लावण्याची सोय आता नाशिक महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी हे पाऊल महत्वाचे मानले जात असून तीन वर्ष हे काम खाजगी ठेकेदाराकडून करुन घेण्यात येणार आहे. यासाठी मनपा 1 कोटी 27 लाख रुपये खर्च करणार आहे.साफसफाईचे आउटसोर्सिंग करणार्‍या नाशिक महापालिकेने आता शहरात मृत होणारी जनावरे उचलणे व खतप्रकल्पावर विल्हेवाट लावण्याचे कामही खासगीकरणातून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन वर्षे मुदतीचा ठेका दिला जाणार असून 1. 27 कोटींच्या खर्चास महासभेने नुकतीच मंजुरी दिली आहे.

घंटागाड्यांमार्फत घरोघरी केरकचरा संकलन व खतप्रकल्पावर वाहून नेण्यासाठी महापालिकेने 354 कोटींचा पाच वर्षे मुदतीचा ठेका दिला आहे. सफाई कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्यामुळे 700 सफाई कर्मचार्‍यांच्या माध्यमातून शहरातील दोन विभाग तसेच गोदाघाटावरील साफसफाईचे कामही आउटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्यात येत आहे. रस्ते स्वच्छतेसाठी रोड स्वीपिंग मशीन खरेदी करण्यात आल्या असून, खासगी मक्तेदाराच्या माध्यमातून त्या यांत्रिकी झाडूंचे संचलन करण्यात येत आहे. तर आता मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी 1.27 कोटी रुपयांच्या खर्चास मंजूर दिली आहे. त्यामुळे लवकरच आउटसोर्सिंगमार्फत मृत जनावरे उचलण्याचे काम होणार आहे. शहरातील मृत जनावरे उचलणे आणि खतप्रकल्पावर नेऊन विल्हेवाट लावण्यासाठी वर्षाला 42.53 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

नाशिक शहरातील नागरिकांच्या दृष्टीने मनपाचे हे महत्वाचे पाऊल आहे. अत्यावश्यक सेवा असून नागरिकांना चांगल्या व दर्जेदार सुविधा मिळाव्या यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले. लवकरच मृत जनावरे उचलण्याचे काम सुरू होणार आहे.
– डॉ. प्रमोद सोनवणे, मनपा पशुसंवर्धन अधिकारी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी