33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक लिंबू मिरची तोडा, विज्ञानाशी नाते जोडा : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अंनिसचे...

नाशिक लिंबू मिरची तोडा, विज्ञानाशी नाते जोडा : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अंनिसचे अभियान..

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभिनव उपक्रम राबविला. सातपुरच्या कामगार नगर येथील रिक्षा स्टँडवर मनपा शाळा क्रमांक १७ कामगार नगर या विद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनी, शिक्षिका यांच्यासह राबविण्यात आले. रिक्षा स्टॅन्ड वरील रिक्षा चालक- मालक यांनी रिक्षाला लावलेले लिंबू मिरची ,बिब्बा ,काळ्या बाहुल्या असे अंधश्रद्धा युक्त साहित्य विद्यार्थ्यांच्या समक्ष आणि सहकार्याने बाजूला केले. त्यांनी असेही जाहीर केले की, ही अंधश्रद्धा आहे .यापुढे आम्ही रिक्षेला अशा प्रकारचे लिंबू मिरची बांधणार नाही. लिंबू मिरची हे खाण्याचे पदार्थ असून खाण्यासाठी त्यांचा उपयोग करू.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभिनव उपक्रम राबविला. सातपुरच्या कामगार नगर येथील रिक्षा स्टँडवर मनपा शाळा क्रमांक १७ कामगार नगर या विद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनी, शिक्षिका यांच्यासह राबविण्यात आले. रिक्षा स्टॅन्ड वरील रिक्षा चालक- मालक यांनी रिक्षाला लावलेले लिंबू मिरची ,बिब्बा ,काळ्या बाहुल्या असे अंधश्रद्धा युक्त साहित्य विद्यार्थ्यांच्या समक्ष आणि सहकार्याने बाजूला केले. त्यांनी असेही जाहीर केले की, ही अंधश्रद्धा आहे .यापुढे आम्ही रिक्षेला अशा प्रकारचे लिंबू मिरची बांधणार नाही. लिंबू मिरची हे खाण्याचे पदार्थ असून खाण्यासाठी त्यांचा उपयोग करू.

महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे म्हणाले की ,शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी व संशोधन वृत्ती निर्माण व्हावी , तसेच लहान लहान अवैज्ञानिक गोष्टींमधून अंधश्रद्धा जोपासल्या आणि जतन केल्या जातात त्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी हे अभियान अंनिसकडून राबविण्यात येत आहे.या अभियानात रिक्षा चालक मालक दादासाहेब राठोड ,सुभाष पवार, अनिल पाटील, सिताराम ठाकरे, संदीप चौधरी, छगन कोल्हे आदी सहभागी झाले होते.

यावेळी मनपा शाळा क्रमांक १७ च्या शिक्षिका शालिनी पगार व आशा बागूल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या अनोख्या अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी