32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रस्वस्त सोन्याचे आमिष : लूट करणारी टोळी अटकेत

स्वस्त सोन्याचे आमिष : लूट करणारी टोळी अटकेत

जमिनीत खोदकाम करताना पुरातन सोने स्वस्त किमतीत विकणाऱ्या परप्रांतीय टोळीला गुन्हे शाखा एकच्या पथकाने जेरबंद केले आहे.  या संशयितांकडून जवळपास पावणे दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, फिर्यादी मोहित मनोज कोतकर, २६, रा. नंदन बंगला, डी. के. नगर, गंगापूर रोड हे बुधवार दि. २४ रोजी दुपारी दोन वाजता आपल्या नंदन नोहा फूड्स, एमआयडीसी, सातपूर या ठिकाणी असताना अज्ञात दोघा संशयितांनी दुकानात येऊन आपल्याला जमिनीत खोदकाम करताना पुरातन २२ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ सापडल्याचे सांगितले. याबाबत त्यांना खरे सोन्याचे मणी दाखवून त्यांचा विश्वास संपादन करत २० हजार रुपयांच्या मोबदल्यात २२ ग्रॅम सोन्याची माळ देऊन संशयित निघून गेले.

या गुन्ह्याबाबत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यातील संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना फुटेज मधील संशयित हे तवली फाटा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोहवा संदीप भांड, महेश साळुंके, पोना मिलींद परदेशी, पोअं विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, आप्पा पानवळ, राजेश राठोड यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून दोन दुचाकीसह संशयित केशाराम पिता सवाराम, रा. बागरियोका वास, रानीवाडा, जिल्हा सांचोर, राजस्थान, बाबुभाई लुंबाजी मारवाडी, रा. आदीवाडा, मारवाडीवास, गांधीनगर, गुजरात आणि रमेशकुमार दरगाराम, रा. पोलीस ठाणा बागराच्या मागे, तहसिल बागरा, जिल्हा जालोर, राजस्थान या तिघांना ताब्यात घेतले.
या तिघा संशयितांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, राजस्थान येथून महिनाभरापूर्वी येवुन ते सर्व तवली फाटा येथील एका मोकळ्या जागी पालाच्या झोपडया उभ्या करून त्यात ते राहत असल्याचे सांगितले. दिवसभर शहरात विविध ठिकाणी रेकी करून नागरीकांना हेरून आम्हाला जमिनीत खोदकाम करतांना पुरातन सोने सापडले असुन ते आम्हाला कमी किमतीत विकायचे आहे असे सांगून हात चालाखीने आमचेकडे असलेले खरे सोने त्यांना दाखवुन खोटे सोने देत असल्याची कबुली देखील त्यांनी सिली आहे.

पोलिसांनी यावेळी त्यांच्या झोपडीच्या पालातुन गुन्हयात वापरलेले मोबाईल, मोटार सायकल, खोटया सोन्याच्या विविध वजनाच्या आणि विविध आकाराच्या सोन्या सारख्या दिसणाऱ्या पिवळ्या धातुच्या माळा, वजनकाटा, रोख रक्कम, सन १९०० मधील जुने चांदीचे कॉईन व खऱ्या सोन्याचे २ मणी असा एकुण १ लाख ६२ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ज्या नागरिकांची अशा प्रकारे फसवणुक झाली असेल त्यांनी तात्काळ सातपूर पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हि कारवाई गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत, विष्णु उगले, सपोउनि रविंद्र बागुल, पोहवा संदिप भांड, महेश साळुंके, शरद सोनवणे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, प्रदिप म्हसदे, रमेश कोळी, धनंजय शिंदे, देविदास ठाकरे, पोना मिलींद परदेशी, प्रशांत मरकड, विशाल देवरे, पोअं विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, नितीन जगताप, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, राजेश राठोड, मपोअं अनुजा येलवे, चालक नाझीम पठाण यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी