32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeसंपादकीयपंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे लोकशाहीची पायाभरणी (भाग ३)

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे लोकशाहीची पायाभरणी (भाग ३)

लोकशाहीतील चारही स्तंभांची उभारणी, त्यांचा आदर याबाबत पंडित जवाहरलाल नेहरूंनी (Pandit Jawaharlal Neharu is fouder of Indian Democracy) आदर्शवत काम केले. विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका या तीनही स्तंभांची भारतीय संविधानाला अपेक्षित उभारणी, त्यांना बळ देणे, त्यांचा आदर राखणे, या तीनही स्तंभांमध्ये परस्परांचा आदर राखतानाच उत्तम समन्वय राहील याची काळजी घेणे, त्यासाठी योग्य प्रथा-पंरपरा निर्माण करून त्यांचे पालन करणे हे काम त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे आणि काळजी घेत केले. लोकशाहीच्या तीनही स्तंभांवर जनतेच्या वतीने अंकुश ठेवण्यासाठी माध्यमांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य राहील याची काळजीही त्यांनी घेतली... वरिष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांचा विशेष लेख.लय

पंडित नेहरूंनी भारतात लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी केली. नेहरू हे लोकशाही व्यवस्थेवर ठाम विश्वास ठेवणारे होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्व सूत्रे पंडित नेहरूंच्या हाती आली. स्वातंत्र्याची फळं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावायची असेल, शेवटच्या माणसाच्या हाती देशातील सत्तेवर अंकुश ठेवण्याचा अधिकार द्यायचा असेल, सर्व घटकांना समान विकासाची संधी देतानाच देशात अहिंसक पद्धतीने सत्ता परिवर्तन घडवून आणण्याची नियमित संधी सर्वसामान्य मतदारांना द्यायची असेल तर देशात लोकशाही रुजणे, तिला वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे आणि योग्य दिशा देत लोकशाही यंत्रणेला भक्कम करणे हे काम अतिशय निष्ठेने, प्रामाणिकपणे, द्रष्टेपणे नेहरूंनी केले. त्यांच्यामुळेच आज देशात लोकशाही गावोगावी, शहरांमध्ये, राज्यात आणि देशात भक्कम पाळेमुळे रोवून उभी राहिलेली दिसते.

गाव ते देशपातळीवर नवे नेतृत्व उभे राहिले आणि महिला, दलित-शोषित, वंचित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांना सत्ताकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली. त्यामागे लोकशाही व्यवस्था तळागाळात पोहोचवून ती भक्कम करण्यासाठीची नेहरूंची मेहनत व तळमळ कारणीभूत आहे.

हे सुद्धा वाचा

महात्मा गांधी यांच्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली होती (भाग -२ )

महात्मा गांधी यांनी देशातील पहिली राज्यघटना लिहिली होती (वरिष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांचा विशेष लेख)

विश्वगुरू होण्यासाठी गांधी-नेहरूंची बदनामी – पूर्वार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

गांधी – नेहरू यांच्यामुळे देशाचे भलेच झाले – उत्तरार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

महात्मा गांधीच्या विरोधात खरंच ब्राह्मण समाज आहे का? (प्रफुल्ल फडके यांचा विशेष लेख – भाग १)

महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. आंबेडकर, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्यात आपण भांडणे लावतो – भाग २ (राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख)
महात्मा गांधी यांच्या प्रेरणेमुळे नेहरू हे स्वतः आधुनिक विचारांचे आणि उदारमतवादी होते. उदारमतवादी आणि आधुनिक विचारांसह भारतीय लोकशाहीची जी इमारत उभी राहिली ती उभारणीचे श्रेय नेहरूंना जाते. त्यांच्यामुळेच जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आज भारत ओळखला जातो. त्यांच्यामुळेच अनेक सर्वसामान्य लोक देशात मुख्यमंत्री, पंतप्रधान होऊ शकले. याउलट आपण आपल्या शेजारील अनेक देशांतील लोकशाही व्यवस्थांची काय अवस्था झालीय हे बघतो आहोत. कुठे लष्कर, कुठे दहशतवादी तर कुठे राजकीय नेते वा घराणेशाहीतून आलेले हुकूमशाह झालेत किंवा काही देशांमध्ये तर अजूनही लोकशाहीच अवतरू शकलेली नाही. ज्या काळात भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते त्याच कालखंडात सुकार्नो हे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यासाठी तर क्वामे एन्कृमाह (Kwame Nkrumah) हे घाना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. मात्र स्वातंत्र्यानंतर जेव्हा या दोन नेत्यांच्या हातात सत्ता आली तेव्हा देशात लोकशाही भक्कम करण्याऐवजी हे नेतेच नंतर हुकूमशाह झाले आणि देशात लोकशाहीची हत्या घडविली.
लोकशाहीतील चारही स्तंभांची उभारणी, त्यांचा आदर याबाबत नेहरूंनी आदर्शवत काम केले. विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका या तीनही स्तंभांची भारतीय संविधानाला अपेक्षित उभारणी, त्यांना बळ देणे, त्यांचा आदर राखणे, या तीनही स्तंभांमध्ये परस्परांचा आदर राखतानाच उत्तम समन्वय राहील याची काळजी घेणे, त्यासाठी योग्य प्रथा-पंरपरा निर्माण करून त्यांचे पालन करणे हे काम त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे आणि काळजी घेत केले. लोकशाहीच्या तीनही स्तंभांवर जनतेच्या वतीने अंकुश ठेवण्यासाठी माध्यमांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य राहील याची काळजीही त्यांनी घेतली.
“The four key dimensions of India’s modern nationhood, as conceived and implemented by Jawaharlal Nehru, were democracy, secularism, socialism and non-alignment. They were interpreted by him in the light of our requirements, as he saw them in the mid-20th century, that is, in the aftermath of the horrors of Partition and in the glow of the first few years of Independence,” असे प्रसिद्ध विचारवंत बेंजामिन झकारिया यांनी ‘फ्रंटलाईन’ या प्रतिष्ठित नियतकालिकात डिसेंबर २०१४ मध्ये प्रकाशित ‘इम्पार्टन्स ऑफ बीईंग नेहरू’ या लेखात म्हटले आहे. झकारिया यांनी मोजक्या शब्दात नेहरूंच्या राष्ट्रउभारणीतील योगदानाचे नेमके वर्णन केले आहे (क्रमश:)
‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ या नावाने ‘लय भारी’ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी