30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक सिटू तर्फे कंत्राटी कामगार आक्रोश मेळाव्याचे आयोजन

नाशिक सिटू तर्फे कंत्राटी कामगार आक्रोश मेळाव्याचे आयोजन

भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सिटू) तर्फे गुरूवारी कंत्राटी कामगार आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला. कंत्राटी कामगार आक्रोश मेळाव्याचे सूत्रसंचालन कॉ. राहुल गायकवाड व आत्माराम डावरे यांनी केले. कॉ. देविदास आडोळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. ॲड. वसुधा कराड यांनी नवीन लेबर कोर्ट व कंत्राटी कामगार याविषयावर मार्गदर्शन केले. कॉ .संतोष काकडे यांनी महत्त्वाचे न्यायालयीन निकाल संदर्भात मार्गदर्शन केले. कॉ. तुकाराम सोनजे यांनी सरकारचे कंत्राटी कामगारां प्रतीचे धोरण यासंदर्भात मार्गदर्शन केले. कॉम्रेड संतोष कुलकर्णी व सतीश खैरनार यांनी मार्गदर्शन केले.

भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सिटू) तर्फे गुरूवारी कंत्राटी कामगार आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला.
कंत्राटी कामगार आक्रोश मेळाव्याचे सूत्रसंचालन कॉ. राहुल गायकवाड व आत्माराम डावरे यांनी केले. कॉ. देविदास आडोळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. ॲड. वसुधा कराड यांनी नवीन लेबर कोर्ट व कंत्राटी कामगार याविषयावर मार्गदर्शन केले. कॉ .संतोष काकडे यांनी महत्त्वाचे न्यायालयीन निकाल संदर्भात मार्गदर्शन केले. कॉ. तुकाराम सोनजे यांनी सरकारचे कंत्राटी कामगारां प्रतीचे धोरण यासंदर्भात मार्गदर्शन केले. कॉम्रेड संतोष कुलकर्णी व सतीश खैरनार यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर यशस्वी कंत्राटी कामगार यांनी आपले अनुभव कथन केले त्यात गोल्डी प्रिसिजन टूल्स, आर्ट रबर, अल्फ इंजिनिअरिंग येथील कामगारांनी आपले अनुभव सांगितले.
त्यानंतर गट चर्चा ४ विभागांमध्ये आयोजित करण्यात आले. यामध्ये १)नगरपालिका- मनपा २)सातपुर विभाग, ३)अंबड विभाग ४)ग्रामीण विभाग यांनी भाग घेतला. गटचर्चा संपल्या नंतर या ४ ही विभागातून प्रत्येकी एक प्रतिनिधींनी आपले मत व्यक्त केले.

या मेळाव्यास सिटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ सिताराम ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.तसेच या मेळाव्यास सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष डॉ. डी एल कराड यांनी “कंत्राटी कामगारांच्या लढ्याची भविष्यातील वाटचाल” यावरती मार्गदर्शन केले. शेवटी या मेळाव्याचे आभार प्रदर्शन आणि समारोप कॉ.आपा वटाणे यांनी केले.
यावेळी कामगार मेळाव्यास कॉ. सतीश खैरनार, कॉ.हिरामण तेलोरे, कॉ. संदीप कातोरे, कॉ.मोहन जाधव, कॉ. संतोष कुलकर्णी, कॉ अरविंद शहापुरे, कॉ अप्पा वटाणे आदिसह जिल्ह्यातील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कंत्राटी कामगार आक्रोश मेळाव्यात पुढील प्रमाणे प्रमुख मागण्या विषयी चर्चा करण्यात आली.
१) किमान वेतन रू.२६ हजार दरमहा निश्चित करा.
२) नियमित कामावरील कंत्राटी कामगारांना कायम करा.
३) कंत्राटदार बदलला तरी कामगारांना कामावरून कमी करू नये.
४) इएसआयसी व पीएफ सर्वांना लागू करा.
५) समान कामाला समान वेतन द्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी