30 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeराष्ट्रीयCBI Red : नरेंद्र मोदींवर तोफ डागली, अन् घरी सीबीआये छापे पडले!

CBI Red : नरेंद्र मोदींवर तोफ डागली, अन् घरी सीबीआये छापे पडले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागणारे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्ली येथील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआयने एकूण 30 ठिकाणी छापे टाकले. जलविद्युत प्रकल्प गैरव्यवहार प्रकरणी CBI कडून ही कारवाई सुरू आहे. यापूर्वीही CBI ने विमा घोटाळ्याप्रकरणी मलिक यांच्यावर कारवाई केली होती. तेव्हा सीबीआयने जम्मू- काश्मीरमधील सत्यपाल मलिक आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले होते.

जम्मू- काश्मीरच्या किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने गुरुवार, 22 फेब्रुवारी रोजी सकाळी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती घेतली. त्याचबरोबर सीबीआयने आणखी 30 ठिकाणी छापे टाकले आहेत. मलिक यांनी आरोप केला होता की, ते राज्याचे राज्यपाल असताना प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मंजूर करण्यासाठी त्यांना 300 कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती. किरू जलविद्युत परियोजना, एक रन-ऑफ-रिवर योजना, जम्मू काश्मीरच्या किश्तवाडा जिल्ह्यात चिनाब नदीवर प्रस्तावित होणार आहे. प्रकल्पामध्ये प्रत्येकी 156 मेगावॅट क्षमतेच्या 4 युनिट्ससह 135 मीटर उंच धरण आणि भूमिगत वीजगृह बांधण्याची कल्पना आहे.

मलिक 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू- काश्मीरचे राज्यपाल होते. मागील महिन्यातही सीबीआयने या प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासासंदर्भात दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील सुमारे 8 ठिकाणी छापे टाकले होते.सीबीआयने मागील महिन्यात टाकलेल्या छाप्यात 21 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम याव्यतिरिक्त डिजिटल उपकरणे, संगणक, मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती. तसेच चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स (प्रा.) लिमिटेडचे माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी, माजी अधिकारी एमएस बाबू, एमके मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चौधरी हे जम्मू आणि काश्मीर केडरचे (आता AGMUT कॅडर) 1994 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

मलिकांचा घरावरील सीबीआय छाप्यानंतर राहुल गांधींनी पंतप्रधांनावर केली टीका

मलिक यांच्या घरावर सीबीआयचा छापा पडल्यानंतर राहुल गांधींनी सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.  राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, “शेतकऱ्यांनी एमएसपी मागितले तर त्यांना गोळ्या घ्याला – ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? तरुणांनी नियुक्ती मागितली तर त्यांना ऐकायलाही नकार द्या – ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? माजी राज्यपाल खरं बोलले तर त्यांच्या घरी सीबीआय पाठवा – ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? प्रमुख विरोधी पक्षाचे बँक खाते गोठवा – ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? कलम 144, इंटरनेट बंदी, तीक्ष्ण तारा, अश्रुधुराचे गोळे – ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? मीडिया असो वा सोशल मीडिया, सत्याचा प्रत्येक आवाज दाबा – ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? मोदीजी, तुम्ही लोकशाहीची हत्या केली आहे, हे जनतेला माहीत आहे आणि जनता त्याला उत्तर देईल!”

हेही वाचा

मोदीजी, तुम्ही लोकशाहीची हत्या केली आहे! राहुल गांधींचा घणाघात

Maratha Reservation : जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात, संगीता वानखेडे यांचा गंभीर आरोप

अरे बाप रे! भाजीत आढळला चक्क जिवंत साप, व्हिडीओ पाहून नेटकरी झाले हैराण

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी