27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररस्त्याकिनारी वृक्षलागवडीच्या वृक्षजन महोस्तवास आयुक्तांच्या शुभहस्ते

रस्त्याकिनारी वृक्षलागवडीच्या वृक्षजन महोस्तवास आयुक्तांच्या शुभहस्ते

रस्त्याकिनारी वृक्षलागवडीच्या शासकीय राजपत्रित आदेशाचे पालन होवून वृक्षनिधी शाश्वत वृक्षसंगोपनासाठी खर्च केला जावा तसेच जैवविविधता जोपासून अन्नसाखळी अबाधित राखणे व पशुपक्षांच्या अधिवासासाठी विविध भारतीय वृक्षप्रजातीच्या रोपांची लागवड करण्याच्या विविध पर्यावरण संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत आज पालिका आयुक्त डॉ.करंजकर यांच्या शुभहस्ते रस्त्याकिनारी भारतीय वृक्षप्रजातींच्या दुर्मिळ वृक्षलागवडीच्या वृक्षजन महोत्सवाची सुरुवात द्वारका येथील उद्याना जवळील रस्त्याकिनारी वृक्षलागवड करून संपन्न झाली.

रस्त्याकिनारी वृक्षलागवडीच्या ( tree plantation) शासकीय राजपत्रित आदेशाचे पालन होवून वृक्षनिधी शाश्वत वृक्षसंगोपनासाठी खर्च केला जावा तसेच जैवविविधता जोपासून अन्नसाखळी अबाधित राखणे व पशुपक्षांच्या अधिवासासाठी विविध भारतीय वृक्षप्रजातीच्या रोपांची लागवड करण्याच्या विविध पर्यावरण संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत आज पालिका आयुक्त डॉ.करंजकर यांच्या शुभहस्ते रस्त्याकिनारी भारतीय वृक्षप्रजातींच्या दुर्मिळ वृक्षलागवडीच्या वृक्षजन महोत्सवाची सुरुवात द्वारका येथील उद्याना जवळील रस्त्याकिनारी वृक्षलागवड ( tree plantation) करून संपन्न झाली.(Commissioner felicitates tree plantation on roadside )

शहरातील विविध भागातही शाश्वत वृक्ष जगविणारी पालिकेच्या माध्यमातून रस्त्याकिनारी वृक्षलागवड करण्याची ग्वाही आयुक्तांनी याप्रसंगी उपस्थीतांना दिली. शहरात अधिक नियोजनात्मक पद्धतीने नागरिकांच्या सहभागाने वृक्ष लागवड करण्यासाठी उद्यान अधीक्षक भदाणे यांनी येत्या बुधवारी 4 वाजता पालिका कार्यालयात सर्व पर्यावरण प्रेमीं नागरिकांची यासंदर्भात बैठक आयोजित केलेली आहे.अतिरिक्त आयुक्त चौधरी यांनी शहरात वृक्ष लागवडीसाठी विशेष पुढाकार घेत जास्तीत जास्त नागरिकांनी पालिकेच्या वृक्षसंवर्धन अभियानात सहकार्य करण्याचे,झाडांवर प्रेम करण्याचे आव्हान नागरिकांना केलेले आहे.तापमान वाढ लक्षात घेता आजचे वृक्ष उद्याचे भविष्य असून झाड त्रास नाही श्वास आहेत,वटसावित्री पौर्णिमेनिमित्त झाडांचे महत्त्व विशद करणाऱ्या उपक्रमाची विविध माध्यमातून आम्ही सुरुवात केलेली असून यास चांगला प्रतिसाद मिळत असून आज या भागातील मोठ्या प्रमाणात महिला या उपक्रमात सहभागी झाल्याचे भारतीताई जाधव यांनी याप्रसंगी नमूद केले.

डॉ भानोसे यांनी विविध संघटनांच्या न्याय मागणीला प्रतिसाद देत पालिकेने हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले व ही मोहीम पुढे अशीच सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.या उपक्रमांतर्गत पालिकेकडून वृक्ष व संरक्षक जाळी घेवून आपल्या घराजवळील रस्त्याकिनारी,मोकळ्या भूखंडात वृक्षलागवड करण्यास इच्छुक नागरिकांनी 9834028599 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पर्यावरण समिती कडून करण्यात येत आहे.

तिग्रानिया कंपनी जवळ मदरटच स्कूल समोर,टाकळी रोड, व्दारका येथे रस्त्याच्या कडेला १५ देशी झाडे गार्डन विभागाने लावली त्यात कंचन, बदाम, कडूलिंब
आयुक्त करंजकर साहेब अतिरिक्त आयुक्त चौधरी साहेब, गार्डन प्रमुख भदाणे साहेब, देवरे साहेब उपस्थित होते. पर्यावरण प्रेमी सौ भारती जाधव यांनी यासाठी प्रयत्न केले. हेमंत जाधव, मनिष बाविस्कर, संदिप भानोसे सर हजर होते.

सकाळी ११:३० ला कार्यक्रम झाला. याप्रसंगी उद्यान अधिकारी,कर्मचारी व परिसरातील विविध नागरिकांसह पर्यावरण प्रेमी कांकरिया,वराडे,विवेक चौधरी, नंदिनी गोहिल,जेजुरकर दांपत्य ,मुस्तुफा पटेल, मुस्तफा सुनेलवाला व मदरटच स्कूल च्या शिक्षिका शालिनी बुलचंदानी, फरीदा नंदिनी ,मंजिरी ,पूजा , शिल्पा व प्रियांका या शिक्षिका सहभागी होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी