29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगोदाआरतीचा मान सर्वसामान्य नाशिककरांना मिळावा – अंबादास खैरे

गोदाआरतीचा मान सर्वसामान्य नाशिककरांना मिळावा – अंबादास खैरे

रामकुंड तीर्थस्थळावर नित्य नियमाने होणाऱ्या गोदाआरतीचा मान प्रतिष्ठित - नामांकित मान्यवर अथवा समितीतील सदस्यापर्यंत मर्यादित न ठेवता सर्वसामान्य नाशिककरांनाही देण्यात यावा अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीला दिले आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीचे अनन्य साधारण महत्व आहे. यामुळे देश-विदेशातील भाविक नाशिक पुण्य नगरीत येत असतात. ऋषिकेश-हरिद्वार-वाराणसीच्या गंगा घाटावर गंगेची नेत्रदीपक आरती केली जाते. त्याच धर्तीवर नाशिकच्या रामतीर्थावर गोदाआरती सुरू करण्यात आली आहे. याकरिता शासनाने रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची नेमणूक केली आहे. समिती मार्फत रामकुंडावर गोदा आरती कार्यक्रम होणार आहे.

रामकुंड तीर्थस्थळावर नित्य नियमाने होणाऱ्या गोदाआरतीचा मान प्रतिष्ठित – नामांकित मान्यवर अथवा समितीतील सदस्यापर्यंत मर्यादित न ठेवता सर्वसामान्य नाशिककरांनाही देण्यात यावा अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीला दिले आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीचे अनन्य साधारण महत्व आहे. यामुळे देश-विदेशातील भाविक नाशिक पुण्य नगरीत येत असतात. ऋषिकेश-हरिद्वार-वाराणसीच्या गंगा घाटावर गंगेची नेत्रदीपक आरती केली जाते. त्याच धर्तीवर नाशिकच्या रामतीर्थावर गोदाआरती सुरू करण्यात आली आहे. याकरिता शासनाने रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची नेमणूक केली आहे. समिती मार्फत रामकुंडावर गोदा आरती कार्यक्रम होणार आहे.

रामकुंडावर होणाऱ्या गोदा आरतीचा मान समिती प्रतिष्ठित किंवा नामांकित मान्यवरांना देतात. परंतु गोदाआरतीचा मान सर्वसामान्य नागरिकाना मिळणे अपेक्षित आहे. गोदाआरतीचा मान सर्वसामान्यांना मिळाल्यास भाविक आरतीच्या वेळे अगोदर उपस्थित राहून मनमोहक आरती करिता गर्दी करतील. यामुळे गोदातिरी भाविकांची संख्या वाढेल व नाशिकच्या पर्यटनास चालना मिळेल.
तरी, नित्य नियमाने होणाऱ्या गोदाआरतीचा मान प्रतिष्ठित – नामांकित मान्यवर अथवा समितीतील सदस्यापर्यंत मर्यादित न ठेवता सर्वसामान्य नाशिककरांना मिळावा असे पत्रात नमूद केले आहे.

मंदिराची नगर म्हणून ओळखली जाते. शिवाय गोदावरीच्या काठावर वसलेले नाशिक सर्वदूर परिचित आहे. नाशिकसह त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे कुंभमेळा देखील भरत असतो आणि याठिकाणी देशभरातील भाविक आणि अनेक नागरिक अस्ती विसर्जनासाठी येत असतात गोदावरी नदीला अनन्य साधारण महत्व देखील प्राप्त आहे. त्यामुळेच आता गंगेप्रमाणे नाशिकच्या रामकुंड परिसरात रोज महाआरती होणार आहे. गंगा नदीला मोठं धार्मिक महत्त्व देखील प्राप्त आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला देखील दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते. गोदावरी नदी देखील गंगा नदीप्रमाणेच धार्मिक महत्त्व प्राप्त असलेली एक महत्त्वाची नदी आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी