33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक जिल्ह्यात पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा :...

नाशिक जिल्ह्यात पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा : छगन भुजबळ

यंदाच्या पावसाळ्यात पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे पाणी डोंगरगाव येथे पोहचेल यादृष्टीने या कालव्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे असे निर्देश राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. दिंडोरी तालुक्यातील मावडी, खडकजाम यासह विविध ठिकाणी पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांची व प्रकल्पाच्या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगरचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, नांदूर मध्यमेश्वर विभागाच्या कार्यकारी अभियंता संगिता जगताप, पुणेगाव कालव्याच्या उपविभागीय अभियंता योगिता घुगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, सद्यस्थितीत एकूण १२ कि.मी , २८ कि.मी, ३५ कि.मी व ५२ कि.मी च्या टप्प्यांवर पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे काम सुरू आहे.

यात प्रामुख्याने कालव्या दरम्यान स्ट्रक्चर आणि पुलांचे कामास गती द्यावी. यासाठी आवश्यक त्याठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे व अधिकचे मनुष्यबळ लावून दर्जात्मक काम ३१ मे पूर्वी पूर्ण करण्यात यावे. यासाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्यात आली असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.आजपर्यंत १२ कि.मी मध्ये २ कि.मी आणि ४९ कि.मी मध्ये ४ कि.मी असे एकूण ६ किमी लेव्हल काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे ४९ किमी मध्ये ९०० मीटर काँक्रीटीकरण काम झाले आहे. या कालव्यावर आजमितीस १२ किमी मध्ये ६ मशीन, २८ किमी मध्ये ६ मशीन तर ३५ किमी मध्ये ६ मशीन असे एकूण १८ मशीनने अतिशय गतीने काम सुरू आहे. या सुरू असलेल्या कामाची परिस्थिती पाहता निश्चितच कालव्याचे काम मे अखेर पर्यंत काँक्रीटीकरण करण्याचे काम १५ जून अखेर पूर्ण होणार असल्याचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांनी यावेळी सांगितले

गेल्या ५० वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा करीत असलेला कालवा भागातील शेतकऱ्यांचे स्वप्न २०१९ मध्ये बाळापूरपर्यंत पूर्ण झाले खरे. परंतु, त्यापुढे चार वर्षांत कोरोना संकट, सरकारी अडचणींमुळे कामात अडथळा आल्याने कामात समाधानकारक प्रगती झाली नाही. त्यामुळे कालव्याला पाणी येणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये तयार झाली होती.
श्री. भुजबळ यांनी पुणेगाव ते दरसवाडी या ६३ किलोमीटर विस्तारीकरण, अस्तरीकरणासाठी ९६ कोटी, तर दरसवाडी ते डोंगरगाव या ८७ किलोमीटर कालवा विस्तारीकरण, अस्तरीकरण, गेट, पूल या कामासाठी १४६ कोटी असे एकूण २४२ कोटींचा निधी मंजूर केला. कामाला सुरवात झाल्याने तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातून काम पूर्ण होण्याच्या आशा बळावल्या आहेत.कालव्यावर प्रत्येकी २० किलोमीटर अंतरावर काम सुरू झाले असून आधुनिक यंत्रांद्वारे काम केले जाणार आहे. पुणेगाव ते दरसवाडी या ९६ कोटींच्या कामात अस्तरीकरण, काँक्रिटीकरण, पूल, कालव्याखालून जाणारे पाण्यासाठी एच.पी.डी., नदीवरील पूल, कालव्याची गरजेनुसार संरक्षक भिंत, गेट आदी कामांचा समावेश आहे. सध्या ३७ ते ६३ किलोमीटर येथे यंत्राने कालवा ‘लेव्हल’, साफसफाईचे काम सुरू आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी