28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक श्रमिकनगर गंजमाळ व म्हाडा वडाळा भुमीपत्रांना विस्थापित करु पाहणाऱ्या मनपा प्रशासनाच्या...

नाशिक श्रमिकनगर गंजमाळ व म्हाडा वडाळा भुमीपत्रांना विस्थापित करु पाहणाऱ्या मनपा प्रशासनाच्या विरोधात कॉंग्रेसचे जोरदार आंदोलन

श्रमिक नगर गंजमाळ व म्हाडा येथील नागरिक हे नाशिकचे भुमीपत्र असुन त्याठिकाणी असलेली घरे हे संपूर्ण घाणीचे साम्राज्याचे आगार असुन तसेच म्हाडा घरकुल वडाळा येथील घरांची अवस्था पाहता त्याठिकाणी माणसं राहत नसुन जणु जनावरं राहत असल्यागत मनपा प्रशासनाची भूमिका आहे का ? यासाठी राजीव गांधी भवन येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. " झोपडी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. वाचवा वाचवा.. नाशिक वाचवा.! बिल्डर धार्जिण्या मनपा प्रशासनाचा धिक्कार असो अश्या घोषणानी परिसर दणाणून सोडला. तसेच आंदोलकांनी मनपा आयुक्त अशोक करंजकर यांची माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली.

श्रमिक नगर गंजमाळ व म्हाडा येथील नागरिक हे नाशिकचे भुमीपत्र असुन त्याठिकाणी असलेली घरे हे संपूर्ण घाणीचे साम्राज्याचे आगार असुन तसेच म्हाडा घरकुल वडाळा येथील घरांची अवस्था पाहता त्याठिकाणी माणसं राहत नसुन जणु जनावरं राहत असल्यागत मनपा प्रशासनाची भूमिका आहे का ? यासाठी राजीव गांधी भवन येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. ” झोपडी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. वाचवा वाचवा.. नाशिक वाचवा.! बिल्डर धार्जिण्या मनपा प्रशासनाचा धिक्कार असो अश्या घोषणानी परिसर दणाणून सोडला. तसेच आंदोलकांनी मनपा आयुक्त अशोक करंजकर यांची माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली.

तसेच म्हाडा घरकुल वडाळा येथे अवैध धंदे सर्रास सुरू असुन येथे महापालिका प्रशासनाचा कुठलाही अधिकारी कर्मचारी फिरकत नसल्याने त्याठिकाणी वाटप केलेल्या घरकुलात कोण राहतो ह्यापासून मनपा प्रशासन अनभिज्ञ असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. मनपा आयुक्तानी हया भागाला भेट देण्याची मागणी मान्य केली असून ते लवकरच ह्या भागातील नागरिकांना भेटणार आहे.

यावेळी शिष्टमंडळाने वतीने आयुक्त अशोक करंजकर यांना दिलेल्या निवेदनात झोपडपट्टी वासियांना देण्यात आलेल्या नोटीसा मनपा प्रशासनाने त्वरीत मागे घ्याव्यात स्थानिक नागरिक भुमीपुत्रांना विस्थापित करण्याचं पाप मनपा प्रशासनाने चालवलं आहे ते त्वरित थांबवावे, बी.डी.भालेकर व विद्यानिकेतन ह्या मराठी शाळा आणि उर्दू शाळा त्वरीत सुरु करण्याच्या मागण्याचे निवेदन दिले निवेदनावर माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल, सुभाष देवरे, उल्हास सातभाई, ज्ञानेश्वर काळे, सुरेश मारु, कुसुमताई चव्हाण, महिला कॉंग्रेस अध्यक्षा वंदना पाटील, हनिफ बशीर, उल्हास पवार, विजय पाटील, ईसाक कुरेशी, प्रा. प्रकाश खळे, अब्दुल बाबा, भालचंद्र पाटील, जावेद इब्राहिम, प्रा. आदिनाथ नागरगोजे, लक्ष्मण धोत्रे, गौरव सोनार, आशिष बागुल, फारुख कुरेशी, अनिल बहोत, रामकिशन चव्हाण, अनिल बेग, फरिन शेख, परवीन शेख, इम्रान तांबोळी, शबाना शेख, सौ सदावर्ते, सलीम सय्यद आदींसह पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी