31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक महापालिकेची वृक्ष गणना वादात आधीचा वाद असताना नव्याने तीन कोटींची...

नाशिक महापालिकेची वृक्ष गणना वादात आधीचा वाद असताना नव्याने तीन कोटींची तरतूद

मनपा प्रशासनाने नाशिक महापलिका हद्दीतील वृक्षगणनेचा निर्णय घेतला असून महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 16.20 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर केले आहे. त्यात वृक्षगणनेसाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.यापुर्वी मनपाचे 2016 साली एका मुंबईच्या ठेकेदाराला नाशिक शहरातील वृक्षगणनेचे काम दिले होते. शहरात सुमारे 25 लाख झाडे असतील, असा अंदाज गृहीत धरून या वृक्षगणनेला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी 8.50 पैसे प्रतिवृक्ष याप्रमाणे दोन कोटी 13 लाख 75 हजार रुपये अदा केले जाणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे निविदा अंतिम झाल्यानंतर वृक्षगणना सुरू झाली.

मात्र, वृक्षगणनेअंती शहरात 49 लाख वृक्ष असल्याची आकडेवारी मक्तेदाराकडून सादर करण्यात आली. वास्तविक पाहता प्रशासकीय मंजुरीपेक्षा अधिक खर्चाच्या वृक्षगणनेसाठी महासभेची फेरमंजुरी घेतली जाणे आवश्यक असताना त्यास फाटा देत ही वृक्षगणना पूर्ण केली गेली. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिस अकादमी व लष्करी हद्दीतील वृक्षगणना संरक्षणाच्या मुद्यावरून करण्यात आली नव्हती. मक्तेदाराला 1.90 कोटी रुपये अतिरिक्त अदा करण्यासाठी मागच्या दाराने प्रस्ताव मंजुरीचे प्रयत्न झाले. परंतु, त्यास विरोध झाल्यानंतर हा वाद न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने देखील ही निविदा अटी-शर्तीनुसार संबंधित मक्तेदाराला अतिरिक्त देयक अदा करणे योग्य नसल्याचा निकाल दिला आहे. त्यानंतरही संबंधित मक्तेदाराला देयक अदा करण्याचे प्रयत्न सुरूच होते. हा वाद अद्यापही कायम असताना वृक्षप्राधिकरणाच्या अंदाजपत्रकात वृक्षगणनेसाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान वृक्षप्राधिकरणाच्या 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात नवीन वृक्षगणनेसाठी पाच कोटींची तर वृक्षसंवर्धनाच्या जुन्या कामांकरिता 2.40 कोटी, नवीन वृक्षसंरक्षक जाळ्यांसाठी 60 लाख, जुने वृक्षसंरक्षक दुरुस्तीसाठी 20 लाख, खत, माती खरेदीसाठी पाच लाख, नर्सरी बाबींकरिता पाच लाख, नर्सरी सुधारणेकरिता 51 लाख, रोपे खरेदीसाठी पाच लाख, कुंड्या खरेदीसाठी 10 लाख, वृक्षप्राधिकरण वाहन खरेदीसाठी 90 लाख, पुष्पोत्सवासाठी 45 लाख, तसेच वृक्ष पुनर्रोपणासाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी