27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसुरक्षागृहाची उभारणी त्वरीत व्हावी : अंनिसची मागणी

सुरक्षागृहाची उभारणी त्वरीत व्हावी : अंनिसची मागणी

ऑनर किलींगची भिती असलेल्या जोडप्यांना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरक्षागृहे उभारावीत,असे राज्याच्या गृह विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.या घटनेला तीन महिने झाले तरीही अजुन पर्य॔त सुरक्षागृह उभारली गेली नाही. ती तत्काळ उभारण्यात यावी अशी मागणी जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, ऑनर किलींग सारख्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी सरकार आता पोलीस बंदोबस्त असलेले सुरक्षागृह उभारण्याचे जाहीर करण्यात आले आहे.जोडप्यांना तिथे निवासासोबत सुरक्षा पुरवली जाणार आहे. जरुरतीनुसार परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एक वर्षापर्यंत सुरक्षागृह पुरविले जाणार आहे.

ही सेवा नाममात्र शुल्क घेऊन पुरवली जाणार आहे. गृह विभागाकडून तसे जाहिर करण्यात आले आहे.
देशात ऑनर किलींग सारख्या घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्या होत्या.भारतीय राज्य घटनेने व्यक्तीला दिलेल्या जीवितेच्या, स्वातंत्र्याच्या आणि समानतेच्या मुलभूत आधिकारावरच हा घाला असल्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना सदर आदेश देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात यापुढे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्य़ात पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.त्यात जिल्हा समाजकल्याण आधिकारी यांचा सदस्य म्हणून तर जिल्हा महिला बालकल्याण आधिकारी यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश असेल. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहासंदर्भात प्राप्त तक्रारींची दखल घेऊन हा कक्ष तत्काळ कार्यवाही करेल, असे गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे.पोलीसांच्या विशेष कक्षा मार्फत केल्या जाणाऱ्या कारवाईचा तसेच न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा त्रैमासिक आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात जिल्हाधिकाऱ्यांच्या अक्षध्येखाली समिती असणार आहे.
आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना धमकी आल्यास व तशी तक्रार प्राप्त झाल्यास अप्पर पोलीस अधिक्षक दर्जाच्या आधिकाऱ्याने एका आठवड्याच्या आत तपास करुन अहवाल सादर करायचा आहे. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने तक्रार दाखल करून पुढील कार्यवाही करायची आहे.अशा जोडप्यांना संरक्षण द्यायचे आहे. विवाह इच्छुकांना अवश्यक सहाय्य करायचे आहे. जातपंचायत मुठमाती अभियानाकडे अनेक जोडप्यांची मदतीसाठी मागणी होत असल्याने अशी सुरक्षा गृह नाशिक शहरात व्हावी
अशी मागणी करण्यात आली आहे

” ऑनर किलींग रोखण्यासाठी महाराष्ट्रात सुरक्षागृह उभारण्यात यावेत अशी मागणी जातपंचायत मुठमाती अभियानाने वेळोवेळी राज्य सरकारकडे केली होती. त्याची घोषणा झाली परंतु प्रत्यक्षात ती अस्तित्वात यावी यासाठी पाठपुरावा चालू आहे. तशी जिल्हाधिकाऱ्याना विनंती करण्यात आली आहे.”
कृष्णा चांदगुडे,
राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान, अंनिस

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी