27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये क्युलेक्स डासांचा हैदोस

नाशिकमध्ये क्युलेक्स डासांचा हैदोस

काही दिवसापूर्वी नाशिक जिल्हयात स्वाईन फ्लूने एका महिलेचा मृत्यू झाला होता तर शहरात देखील ३रुग्ण आढळले होते. त्याची टांगती तलवार असताना शहरात गोदावरीमुळे ज्या पानवेली वाढल्या आहेत त्यामुळे शहरात क्युलेक्स डासांचा हैदोस वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातून मनपा मुख्यालयात तक्रारीचा पाऊस पडत असून पानवेली काढण्यासाठी आरोग्य विभागाने घनकचरा विभागाला साकडे घातले आहे. दोन महिन्यापूर्वी पत्र देऊनदेखील त्याची घनकचरा विभागाने दखल न घेतल्याने घनकचरा विभाग नागरिकांच्या आरोग्याबाबत किती गंभीर आहे याबाबत शहरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

काही दिवसापूर्वी नाशिक जिल्हयात स्वाईन फ्लूने एका महिलेचा मृत्यू झाला होता तर शहरात देखील ३रुग्ण आढळले होते. त्याची टांगती तलवार असताना शहरात गोदावरीमुळे ज्या पानवेली वाढल्या आहेत त्यामुळे शहरात क्युलेक्स डासांचा (Culex mosquito) हैदोस वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातून मनपा मुख्यालयात तक्रारीचा पाऊस पडत असून पानवेली काढण्यासाठी आरोग्य विभागाने घनकचरा विभागाला साकडे घातले आहे. दोन महिन्यापूर्वी पत्र देऊनदेखील त्याची घनकचरा विभागाने दखल न घेतल्याने घनकचरा विभाग नागरिकांच्या आरोग्याबाबत किती गंभीर आहे याबाबत शहरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.(Culex mosquito menace in Nashik)

महापालिका हद्दीमध्ये गोदावरी, वालदेवी आणि नंदीनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पानवेली वाढल्या आहेत. नदीपात्रात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता अनेक ठिकाणी नदीपात्रामधे नागरिकांनी जुने कपडे सह विविध टाकाऊ वस्तू टाकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पानवेलीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. याचमुळे क्युलेक्सडासांची घनता वाढल्याने नदीकाठावरील नागरिक त्रस्त झाले आहेत . या पानवेली काढण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी पत्रामध्ये करण्यात आली आहे.त्यामुळे पानवेलीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. याचमुळे क्युलेक्सडासांची घनता वाढल्याने नदीकाठावरील नागरिक त्रस्त झाले आहेत . या पानवेली काढण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी पत्रामध्ये करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील गाजल्या होत्या पानवेली
शहरातील सांडपाणी तसेच येथील औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी गोदावरी नदीमध्ये मिसळत असल्याने गोदावरी नदीचे दिवसेदिवस प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणामुळे गोदावरीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात पानवेली पसरत आहे. त्याचा परिणाम गोदावरी नदीकाठालगत असलेल्या नाशिक शहराला नव्हे तर पुढे निफाड तालुक्यातील चाटोरी, सायखेडा, चांदोरी, गोंडेगाव, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, कोठुरे, मांजरगाव आदी गावातील नळपाणी पुरवठा योजनांवर देखील होत आहे. त्यामुळे शासनाने उल्हास नदी पॅटर्न राबवून गोदावरी नदीतील पानवेलीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी आमदार दिलीप बनकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केली होती.

पानवेलीवर खर्च पाण्यात
पानवेली काढण्याच्या नावाने मनपाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. त्यासाठी विविध यंत्रे खरेदी करण्यात आली. महापालिकेचे काही अधिकारी आणि ठेकेदार गब्बर झाले मात्र पानवेलीचा प्रश्न कायम असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे .महापालिकेचे काही अधिकारी आणि ठेकेदार गब्बर झाले मात्र पानवेलीचा प्रश्न कायम असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी