27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रविकासाच्या व्हीजनमुळे वाजेचा विजय निश्चित-शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल

विकासाच्या व्हीजनमुळे वाजेचा विजय निश्चित-शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल

राजभाऊ वाजे हे सर्वसामान्यांचे कैवारी आहेत. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून निवडून आल्यानंतर ते नाशिकचा निश्चितच कायापालट करतील,असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल यांनी व्यक्त केला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारानिमित्त मालेगाव स्टॅन्ड येथून भव्य मशाल रॅली तसेच पंचवटीतील प्रचार कार्यालय उदघाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बागूल बोलत होते.

राजभाऊ वाजे (Rajbhau Waze) हे सर्वसामान्यांचे कैवारी आहेत. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून निवडून आल्यानंतर ते नाशिकचा निश्चितच कायापालट करतील,असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांनी व्यक्त केला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajbhau Waze) यांच्या प्रचारानिमित्त मालेगाव स्टॅन्ड येथून भव्य मशाल रॅली तसेच पंचवटीतील प्रचार कार्यालय उदघाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बागूल (Sunil Bagul) बोलत होते.(Development vision ensures Waze’s victory: Shiv Sena’s Deputy Leader Sunil Bagul)

व्यासपीठावर जिल्हाप्रमुख सुधाकरभाऊ बडगुजर,सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड महानगरप्रमुख विलास शिंदे,मांजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, डी.जी. सुर्यवंशी,महेशभाऊ बडवे,मामा राजवाडे, बाळासाहेब वाघ आदी होते. मशालरॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले होते. राजाभाऊ वाजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो आदी घोषणानी परिसर दणाणला होता.

उद्धव ठाकरे यांनी ज्यांना मोठे केले त्यांनीच दगाबाजी करून आपल्या तुंबड्या भरल्या.नाशिकचे खासदार गोडसे हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.पात्र उमेदवार असतांनाही उद्धव साहेबांनी दोन वेळा त्यांना खासदार केले.परंतु केवळ स्वार्थासाठी त्याने साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे या निवडणुकीत लोक आता गोडसेंना चांगला धडा शिकवून त्यांना घरी घरी बसवतील,असे शिवसेना ठाकरे घाटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपल्या भाषणात सांगितले. सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,महानगरप्रमुख शिंदे, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे यांची यावेळी भाषणे झाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी