29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहायुतीला ओबीसी मतांची आवश्यकता नाही का?; गजू घोडके

महायुतीला ओबीसी मतांची आवश्यकता नाही का?; गजू घोडके

ओबीसीचे राष्ट्रीय नेते मा. छगनराव भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्याची सूचना देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार आम्ही मानतो. परंतु त्या सुचनेचे पालन न करणाऱ्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा निषेध करतो. तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीला ओबीसीच्या मतांची गरज आहे का असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे प्रतिपादन ओबीसी नेते तसेच सुवर्णकार समाजाचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी केले. नाशिक येथे आज दि. २१ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की महायुतीच्या जागा वाटपासाठी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

ओबीसीचे राष्ट्रीय नेते मा. छगनराव भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्याची सूचना देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार आम्ही मानतो. परंतु त्या सुचनेचे पालन न करणाऱ्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा निषेध करतो. तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीला ओबीसीच्या मतांची (OBC votes) गरज आहे का असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे प्रतिपादन ओबीसी नेते तसेच सुवर्णकार समाजाचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके ( Gaju ghodke ) यांनी केले. नाशिक येथे आज दि. २१ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की महायुतीच्या जागा वाटपासाठी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,( Doesn’t the Grand Alliance need OBC votes?; Gaju Ghodke )

उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. यावेळी शहा यांनी छगनराव भुजबळ यांनी नाशिक लोकसभा लढवावी असे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही भुजबळ यांनी निवडणूक लढवावी असे मत मांडले. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ यांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. शहा यांनी सूचना दिल्यानंतर २६ दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊन ही नाशिक लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी केली नाही. त्यामुळे छगनराव भुजबळ यांनी दि. १९ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन पक्ष हितासाठी लोकसभा निवडणुक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला.

भुजबळ यांना मानणारा वर्ग राज्यासह दिल्ली, बिहार राजस्थान, गोवा, मध्यप्रदेश आदी राज्यात आहे. त्यांनी दिल्ली येथील रामलीला मैदानावर जयपुर, पाटणा येथे ओबीसीच्या महारॅली घेतल्या होत्या. ते खासदार झाले असते तर देशातील ओबीसी मध्ये वेगळा संदेश गेला असता त्याचा लाभ भाजपाला झाला असता ही बाब लक्षात घेऊन अमित शाह यांनी त्यांना उमेदवारी देण्याची सूचना केली याबद्दल त्यांचे आभार. परंतु नाशिक लोकसभेची उमेदवारी अद्याप घोषित न करणाऱ्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा निषेध करण्यात येत आहे. ना. भुजबळ यांनी सगळा प्रस्थापित समाज अंगावर घेतला. ओबीसी बारा बलुतेदारांवरच प्रचंड मोठं संकट त्यांनी पेलल, एक ऋण म्हणून ओबीसी महायुतीला ओबीसीच्या मतांची गरज आहे की नाही हा सवाल राज्यातील सर्व ओबीसी कार्यकत्यांना पडला आहे असे घोडके यांनी म्हटले आहे. ओबीसी बारा बलुतेदारांवरच प्रचंड मोठं संकट त्यांनी पेलल, एक ऋण म्हणून ओबीसी महायुतीला ओबीसीच्या मतांची गरज आहे की नाही हा सवाल राज्यातील सर्व ओबीसी कार्यकत्यांना पडला आहे असे घोडके यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी