31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिवसेना अथवा युतीच्या वतीने उमेदवारी करण्याची इच्छा माजी महापौर दशरथ पाटील

शिवसेना अथवा युतीच्या वतीने उमेदवारी करण्याची इच्छा माजी महापौर दशरथ पाटील

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २००४ साली काठावर पराभव झाला होता मात्र आजही आपला हक्क त्या जागेवर असल्याने शिवसेना प्रमुखांच्या इच्छेनुसार पुन्हा प्रस्ताव शिवसेनेकडे दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उमेदवारी करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून मधल्या टोलनाक्यांची अडचण असली तरी उद्धव ठाकरे यावर लवकर निर्णय घेतील असा विश्वास माजी महापौर दशरथ पाटील यांनी व्यक्त केला आहे. महायुती चा उमेदवार त्यावेळी मी असल्याने या महायुतीकडून मागणी झाली तरी आपणास अडचण राहणार नसल्याची भूमिका दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

आगामी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २००४ साली काठावर पराभव झाला होता मात्र आजही आपला हक्क त्या जागेवर असल्याने शिवसेना प्रमुखांच्या इच्छेनुसार पुन्हा प्रस्ताव शिवसेनेकडे दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उमेदवारी करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून मधल्या टोलनाक्यांची अडचण असली तरी उद्धव ठाकरे यावर लवकर निर्णय घेतील असा विश्वास माजी महापौर दशरथ पाटील ( Dashrath Patil ) यांनी व्यक्त केला आहे. महायुती चा उमेदवार त्यावेळी मी असल्याने या महायुतीकडून मागणी झाली तरी आपणास अडचण राहणार नसल्याची भूमिका दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.( willing to contest on behalf of Shiv Sena or alliance Former Mayor Dashrath Patil )

नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये भेट देऊन ग्रामस्थांचा कौल लक्षात घेऊनच मी निवडणुकीची तयारी केली असल्याचे सांगून दशरथ पाटील यांनी लोकसभा लढण्याचा निर्धार व्यक्त केला. आतापर्यंत २७० गावांनी निवडणूक लढण्यासाठी पाठबळ दिले आहे त्या ठिकाणी गेल्यावर मला माझी ओळख सांगण्याची गरज लागली नाही. इतका घरोबा प्रत्येक गावाने मला दिला आहे. परिसरातील गावांचे कौल घेऊन झाल्यानंतर आता मी शहराकडे वळलो आहे. नाशिक शहराच्या सर्व भागांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

माझ्या कारकिर्दीमध्ये मागील कुंभमेळ्यात मी २२ पुल बांधले होते तीन जलशुद्धीकरण केंद्र अशा विविध विकास योजना शहरात राबविण्यात आल्या होत्या. शहरातील वाचाळ वीरांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शहराला वळण, गती देण्याच्या उद्देशाने आपण निवडणुकीत लढण्याचा विचार केला असल्याचे दशरथ पाटील यांनी सांगितले.
२००४ सालीच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यसभा देण्याचा निर्णय दिला होता मात्र आपण लोक सभेची निवडणूक जनतेमधून लढणारा असल्याचे सांगून मी त्याला नाकार दिला होता. त्या जागेवर माझा हक्क आहे. ७००० मतांनी मी हरलो होतो त्यामुळे पुन्हा एकदा जनतेजवळ कौेल मागण्यासाठी मी जाणार आहे नागरिकांनी शहराच्या विकासाला जबाबदार म्हणून चांगला उमेदवार द्यावा हीच अपेक्षा दशरथ पाटील यांनी व्यक्त केली.

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते संजय राऊत यांच्या माध्यमातून मी भेट घेऊन शिवसेनेतून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिड महिन्यापूर्वी दिला होता संजय राऊत यांनी तो उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचवलां आहे. प्रत्यक्षात इच्छा नसलेल्याला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी याबाबत माझा विचार करावा असेही दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी