28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसात्विकतेचा कडेलोट करा, मोक्ष मिळेल - जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज

सात्विकतेचा कडेलोट करा, मोक्ष मिळेल – जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज

भक्ती मार्गात असताना गळ्यात रुद्राक्षांच्या माळा असाव्यात असे नाही .त्रिकाल संध्या केली पाहिजे असेही नाही. देवाला जिंकण्यासाठी फार काही करण्याची गरज नाही. भगवी वस्त्रे घालण्याची गरज नाही. देव भक्तीचा भुकेला आहे. भक्ती केली तर देव खुश होणार. यातून तुमचे कल्याण होणार . कृपादृष्टी करणे देवाचे कामच आहे. सात्विकतेचा कडेलोट करा, मोक्ष मिळेल असे अनमोल विचार अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी भक्तांना मार्गदर्शन करताना मांडले.जनम संस्थानाच्या वतीने आशेवाडी येथील उत्तर महाराष्ट्र उपपिठात जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचन दर्शन समस्या मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यावेळी भक्तांना मार्गदर्शन करताना जगद्गुरु श्री बोलत होते. यावेळी जीवनातील समस्या सोडवण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी 536 भक्तांनी जगद्गुरु श्रींच्या उपस्थितीत उपासक दिक्षा घेतली तर 195 उपासकांनी साधक दिक्षा घेतली. भक्तांना मार्गदर्शन करताना जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज पुढे म्हणाले की, भक्ती करत असताना देखील जीवनात संकटे येतात. त्यावेळी देवाला कटघरात उभे केले जाते. आम्ही भक्ती करतो, तरी संकटे का येतात असा प्रश्न विचारला जातो . जीवनात दोन प्रकारे संकटे येत असतात. यातील काही संकटे आपल्या चुकांमुळे येतात तर काही संकट आहे आपल्या प्रक्तनामुळे येतात. मागच्या जन्मीच्या चुका या जन्मी फेडावे लागतात. भगवान कृष्णाला देखील यामुळेच कारागृहात जन्माला यावे लागले. अभिमन्यू देखील यामुळेच चक्रव्युहात अडकला . कसा आनंद मिळेल, किती दुःख येईल हे प्राक्तनातच असते. सद्गुरूंची भेट देखील मागच्या जन्माच्या ऋणानुबंधामुळेच होत असते. मनुष्य जन्म हा देखील नशिबामुळेच मिळालेला आहे. मागच्या जन्मीचे पुण्य म्हणून या जन्मी मनुष्य देह मिळाला आहे. या जन्माची तरतूद करायची असल्यास साधुसंतांच्या संगतीत गेले पाहिजे. देव चराचरात आहे. देव संतांच्या रूपात जन्म घेतात. संतांच्या संपर्कात राहिल्यास पापाचे गाठोडे कमी होते. जन्माच्या प्रवासात गुरूंसोबत चला, यामुळे जीवनाच्या प्रवासात कमी चुका होतील. जेव्हा भक्त संतांवर प्रचंड प्रेम करतो ,तेव्हा ते चुकीच्या मार्गाला जाऊ देत नाहीत. या जन्मात कमीत कमी चुका केल्यास पुढील जन्म चांगला मिळेल.

देवाला जो अनन्यभावे शरण जातो. ज्याचा देवच प्राण, देवच श्वास, देवच भाव असं असेल तर त्याला कोणाकडे काहीच मागण्याची गरज नाही. देव आपोआप सगळं देतो . प्रत्येकात देव आहे. स्वप्नात देखील कोणाचं चिंतू नका, कोणाला फसवू नका ,लबाडी करू नका, खोटं बोलू नका. अशा बाबी केल्याने देवत्व येते. गुरूंची आज्ञा पाळावी. दंभाचार, रजोगुण , तमोगुण कमी करावे. प्रपंचातून परमार्थ साधला जातो. याला पराभक्ती म्हणतात. अध्यात्म आणि प्रपंच यात मोठा फरक नाही. प्रपंचात राहून गुरूंचे ऐकायचं, अध्यात्म आपोआप होते असे मौलिक विचार माऊलींनी यावेळी मांडले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी