31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जिल्हा बँकेविरोधात निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा एल्गार

नाशिक जिल्हा बँकेविरोधात निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा एल्गार

नाशिक जिल्हा बँकेने सुरू केलेल्या सक्तीच्या थकबाकी वसुलीविरोधात व जप्ती प्रक्रियेविरोधात आज निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेविरोधात एल्गार पुकारला आहे. जिल्हा निबंधक गौतम बलसाने यांनी सादर केलेल्या अहवालानुसार जिल्हा बँकेत संचालक व अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची ईडी चौकशी करण्याची मागणी यावेळी निफाड तालुका शेतकरी संघर्ष समितीने केली. निफाड तालुका शेतकरी संघर्ष समितीची बैठक आज शनिवारी निफाड बाजार समिती सभागृहात चाटोरी सोसायटीचे चेअरमन सदाशिव खेलुकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेकडून सुरू असलेल्या पठाणी वसुलीविरोधात चर्चा करून तीव्र जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत अशोक आंधळे, प्रकाश अडसरे, सुनील पवार, योगेश शिंदे, सुरेश मोरे, योगेश कुयटे, उगाव सोसायटीचे दत्तू सूडके, सागर निकाळे, मोतीराम मोगल, अब्दुलभाई, विनायक घोलप, पप्पू शिंदे, बाळासाहेब मुरकुटे आदींनी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या व्यथा बैठकीत मांडल्या. शेतकरी संघटनेचे नेते भगवान बोराडे, पिंपळगावचे चंद्रकांत मोरे, साकोरेचे विलासराव बोरस्ते, जयराम मोरे, करंजगावचे माजी सरपंच व राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके पाटील, सदाशिव खेलुकर, प्रकाश अडसरे, बाजीराव शिंदे यांनीही यावेळी बैठकीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून निर्णायक लढा उभारून जप्तीची कारवाई रोखण्यासाठी उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. निफाड तालुक्यात ७७४९ शेतकरी जिल्हा बँकेचे थकबाकीदार असून शेतकरी अत्यंत अडचणीत असतानाही बँकेने सुरू केलेली कारवाई बेकायदेशीर असून धनधांडग्यावर आधी जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी विलास बोरस्ते यांनी केली. चंद्रकांत मोरे व भगवान बोराडे यांनी संघर्ष समितीच्या चळवळीची माहिती यावेळी देत निफाड तालुक्यातील सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या लढयात सहभागी होण्याचे आवाहन करत २७ तारखेला नाशिकला गोल्फ क्लब मैदानजवळ सुरू असलेल्या आंदोलनस्थळी होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. करंजगावचे माजी सरपंच व राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनीही यावेळी बैठकीत आक्रमक भूमिका घेत जिल्हा बँकेच्या तुघलकी कारभारावर आसूड ओढत अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जप्तीवेळी ठोकशाहीने उत्तर देण्याचे आवाहन केले. यावेळी बैठकिस प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे, नवनाथ गावले, संजय झालटे, दत्तात्रय चौधरी, अभिमन्यू खिंडे, राजेंद्र मोरे, सजन ईखे, मधुकर आहेर, प्रभाकर कोल्हे, श्रीराम सरोदे, रामकिसन वडघुले, जयवंत मापारी, अब्दुलभाई शेख, नामदेव पवार, चंद्रशेखर गावले, भाऊसाहेब भंडारे, प्रशांत धूमाळ, जयवंत मापारी, राम मोरे, गणपत कुयटे, अशोक मोगल, तानाजी टरले, राजेंद्र मोरे, सोपान वडघुले, राजेंद्र आहेर आदीसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

नाशिक जिल्हा बँकेकडून निफाड तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे लिलाव काढून जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. अस्मानी सुलतानी संकटामुळे कर्जाच्या खाईत गेलेल्या शेतकर्यांना शासनाने दिलासा देणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेचे वाटोळे करणाऱ्या बड्या धेंडांवर आधी जप्तीची कारवाई करावी अन्यथा निफाड तालुका शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हा बँकेसमोर उग्र आंदोलन छेडण्यात येवून वसुली अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल. तसेच सत्ताधाऱ्यांनी हिंमत असेल तर गौतम बलसाने यांच्या अहवालानुसार बँकेची ईडी चौकशी करावी, म्हणजे दूध का दूध व पाणी का पाणी होईल.

—- श्री.खंडू माधव बोडके-पाटील
माजी सरपंच करंजगाव
सदस्य : राज्य बियाणे उपसमिती, मुंबई

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी