28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeक्राईमनाशिक बालकाच्या मृत्यूप्रकरणी डॉ. नितीन फरगडे गुन्हा दाखल

नाशिक बालकाच्या मृत्यूप्रकरणी डॉ. नितीन फरगडे गुन्हा दाखल

आजाराचे योग्य निदान न करता हयगयीने उपचार करून निष्काळजीपणा करून दहा वर्षीय बालकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अखिलेश भिरीगुनाथ शर्मा (रा. जाधव संकुल, अंबड गाव, नाशिक) यांचा मुलगा अमन अखिलेश शर्मा (वय १०) याला ताप आला होता. त्यावेळी फिर्यादी शर्मा यांनी त्याच्या मुलाला डॉ. नितीन फरगडे (रा. मारुती मंदिरासमोर, संजीवनगर, अंबड गाव, नाशिक) याच्याकडे नेले होते. डॉ. फरगडे याच्याजवळ कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना या बालकास ताप आलेला असताना आजाराचे योग्य निदान केले नाही, तसेच हयगयीने उपचार करून वैद्यकीय निष्काळजीपणा दाखवून बालकावर उपचार केले.

आजाराचे योग्य निदान न करता हयगयीने उपचार करून निष्काळजीपणा करून दहा वर्षीय बालकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अखिलेश भिरीगुनाथ शर्मा (रा. जाधव संकुल, अंबड गाव, नाशिक) यांचा मुलगा अमन अखिलेश शर्मा (वय १०) याला ताप आला होता. त्यावेळी फिर्यादी शर्मा यांनी त्याच्या मुलाला डॉ. नितीन फरगडे (रा. मारुती मंदिरासमोर, संजीवनगर, अंबड गाव, नाशिक) याच्याकडे नेले होते. डॉ. फरगडे याच्याजवळ कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना या बालकास ताप आलेला असताना आजाराचे योग्य निदान केले नाही, तसेच हयगयीने उपचार करून वैद्यकीय निष्काळजीपणा दाखवून बालकावर उपचार केले.त्यामुळे या बालकाचा मृत्यू झाला.

हा प्रकार दि. १३ ते १७ सप्टेंबर २०१९ दरम्यान ज्युपिटर हॉस्पिटल येथे घडला.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात डॉ. नितीन फरगडे यांच्याविरुद्ध बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी