28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शेतकरी आंदोलन सुरूच

नाशिक शेतकरी आंदोलन सुरूच

वनहक्क दावे मंजूर करावेत, कांदानिर्यात बंदी उठवावी, शेतमालाला हमीभाव, आशासेविकांच्या मानधनात वाढ देऊन शासकीय सेवेचा दर्जा द्यावा तसेच अन्य मागण्यांसाठी गेल्या सोमवारपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन सलग सातव्या दिवशी रविवारी सुरूच होते. याबाबत (दि. ४) अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून त्यानंतर मोर्चाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे माजी आमदार जे. पी. गावित म्हणाले.यावेळी गावित यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा काही कामानिमित्त बाहेरगावी जात आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासोबत सोमवारी (दि.४) बैठक होणार आहे.

वनहक्क दावे मंजूर करावेत, कांदानिर्यात बंदी उठवावी, शेतमालाला हमीभाव, आशासेविकांच्या मानधनात वाढ देऊन शासकीय सेवेचा दर्जा द्यावा तसेच अन्य मागण्यांसाठी गेल्या सोमवारपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन सलग सातव्या दिवशी रविवारी सुरूच होते. याबाबत (दि. ४) अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून त्यानंतर मोर्चाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे माजी आमदार जे. पी. गावित म्हणाले.यावेळी गावित यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा काही कामानिमित्त बाहेरगावी जात आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासोबत सोमवारी (दि.४) बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कामांच्या अंमलबजावणी नेमकी कशी करणार याबाबत चर्चा होईल. त्यात आमच्या मागण्या कशा पूर्ण होतात, किती दिवसांत त्यांची अंमलबजावणी केली जाते त्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असेही गावित यांनी सांगितले. शासकीय कार्यालयांचे कामकाज सोमवारी पूर्ववत सुरू झाल्यानंतर वनहक्क दाव्याबाबत तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन महिन्यांच्या टाइमबॉन्ड कार्यक्रम आखून सर्व दावे निकाली काढण्याची ग्वाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली तर, धोरणात्मक निर्णयाबाबत केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे सांगत शर्मा यांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र त्यास माजी आ. जे. पी. गावित यांनी नकार देत आंदोलनावर ठाम राहत असल्याचे सांगितले.

रविवारीही ट्रॅफिक जॅम

ऐन सुटीच्या दिवशी रविवारी आंदोलनामुळे शहराच्या काही ठिकाणची वाहतूक खोळंबली. रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, मुंबई नाका, त्र्यंबक नाका, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बराच वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. आंदोलनाच्या ठिकाणी पुन्हा महिलांनी स्वयंपाक करत सर्वांसाठी जेवण बनविले. अनेक आंदोलक दुपारच्या वेळी लागणाऱ्या कडक उन्हामुळे हैराण झाले होते, त्यामुळे त्यांनी ताडपत्रीचा आडोसा घेत सावली मिळविण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलकांनी दुपारच्या फावल्या वेळेत मोबाईलवरील मनोरंजनाचा आनंद लूटला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी