28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक लासलगाव येथे शरद पवारांची तोफ धडाडणार

नाशिक लासलगाव येथे शरद पवारांची तोफ धडाडणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची पहिली जाहीर सभा ता. ९ मार्च रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लासलगाव येथे होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा मतदारसंघ लढविणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, हे शरद पवार यांच्या सभेतच स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे. बारामती नंतरचा सर्वात सेफ मतदारसंघ म्हणून शरद पवार नेहमीच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख करतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी पवार यांनी दिंडोंरीला प्राधन्य दिले असून ही सभा राज्याच्या राजकारणाला दिशा देणार, असा विश्वास महाआघाडीकडून व्यक्त केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची पहिली जाहीर सभा ता. ९ मार्च रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लासलगाव येथे होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा मतदारसंघ लढविणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, हे शरद पवार यांच्या सभेतच स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.
बारामती नंतरचा सर्वात सेफ मतदारसंघ म्हणून शरद पवार नेहमीच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख करतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी पवार यांनी दिंडोंरीला प्राधन्य दिले असून ही सभा राज्याच्या राजकारणाला दिशा देणार, असा विश्वास महाआघाडीकडून व्यक्त केला जात आहे. सध्या मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. येथे केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमोर स्वपक्षासह महाआघाडीचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे.

कांदा निर्यातबंदी, द्राक्ष उत्पादकांची परवड, दुष्काळ तसेच बँकांकडून होणारे तगादे यामुळे दिंडोरी लोकसभा (Dindori Loksabha) मतदारसंघात सत्ताधारी भाजपसह महायुतीबाबत शेतकरी संतप्त आहेत. महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मागील तीन दिवसात हा मतदारसंघ पिंजून काढला. पदाधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेतल्यात. या बैठकांमध्ये हा मुद्दा ठसठसीत पद्धतीने समोर आला. यामुळे महाआघाडीच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.

त्यातच ता. ९ मार्च रोजी शरद पवार यांची जाहीर सभेचे आयोजन सुरू झाले. आज दुपारी महाआघाडीचे स्थानिक पदाधिकारी सभेची जागा निश्चित करतील. महाआघाडीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला असून, येथे पक्षाकडून इच्छुक असलेल्यांपैकी कोणाच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडणार, हे देखील स्पष्ट होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी