27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची तब्बल २ कोटी १५ लाख ८८ हजार लिटरने पाणी क्षमता वाढली आहे. आतापर्यंत १७५० हायवा ट्रक व १९९ ट्रॅक्टर च्या माध्यमातून तब्बल २१ हजार ६२३ क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला असून, पुढील १५ जुनपर्यंत ही मोहिम राबविली जाणार आहे.जलसमृद्ध नाशिक अभियानाअंतर्गत भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाऊंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थांच्या पाठबळाच्या आधारे ही मोहिम राबविली जात असून १४ व्या दिवशी १६२ हायवा ट्रक व ८ ट्रॅक्टर माती काढण्यात आली.

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची (Gangapur dam) तब्बल २ कोटी १५ लाख ८८ हजार लिटरने पाणी क्षमता वाढली (water capacity increased) आहे. आतापर्यंत १७५० हायवा ट्रक व १९९ ट्रॅक्टर च्या माध्यमातून तब्बल २१ हजार ६२३ क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला असून, पुढील १५ जुनपर्यंत ही मोहिम राबविली जाणार आहे.जलसमृद्ध नाशिक अभियानाअंतर्गत भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाऊंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थांच्या पाठबळाच्या आधारे ही मोहिम राबविली जात असून १४ व्या दिवशी १६२ हायवा ट्रक व ८ ट्रॅक्टर माती काढण्यात आली.(Gangapur dam’s water capacity increased by 2 crore litres)

जवळपास १९६८ क्युबिक मीटर गाळाचा १४ व्या दिवशी उपसा करण्यात आला. धरणातून काढलेला गाळ आजुबाजुच्या शेतकऱ्यांना मोफत दिला जात असून, यामुळे जमीनीची सुपिकता वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान, या मोहिमेसाठी शहरातील सर्वच प्रमुख संस्था, संघटना आणि फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून, त्यासाठी आर्थिक सहाय्य दिले आहे. ही मोहिम जिल्ह्यातील अन्य धरण, तलाव, गांव तळे येथे देखील राबविली जाणार आहे. जुनपर्यंत ही मोहिम राबविली जाणार असल्याने, मोठ्या प्रमाणात धरणांची पाणी क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी 744 744 37 33 व 744 744 37 66 या क्रमांकावर संपर्क साधावा व आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जलसमृद्ध नाशिक अभियान 2024 च्या वतीने करण्यात आले आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी