29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक रोजगार व उत्पन्न देणाऱ्या शेकडो कंपन्यांचा अंबड एमआयडीसी ते विल्होळी रस्त्याची...

नाशिक रोजगार व उत्पन्न देणाऱ्या शेकडो कंपन्यांचा अंबड एमआयडीसी ते विल्होळी रस्त्याची दुरवस्था

असंख्य छोट्या मोठ्या कंपन्या असणाऱ्या विल्होळी ते अंबड एमआयडीसी कडे जाणाऱ्या लिंक रोडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने या ठिकाणी असलेल्या चार ते पाच हजार कामगारांचा प्रवास गेल्या वर्षानुवर्षापासून खडतर बनला आहे.शेकडो उद्योजकांनी अनेकदा आंदोलने केले. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊनही रस्त्याची परिस्थिती जैसे थेच असल्याने कामगार वर्गासह उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी केलेल्या आंदोलनानंतर या ठिकाणी काही लाखो रुपये खर्च करून कच्चा स्वरूपात तयार करण्यात आलेला रस्ता पूर्णतः व खराब झाल्याचे चित्र आहे.

विल्होळी येथील हॉलिडे हॉटेल येथून ते अंबड एमआयडीसी कडे जाणाऱ्या लिंक रोड दरम्यान शेकडो कंपन्या व छोटे-मोठे लघुउद्योजक आहेत. याठिकाणी ४ हजार हून अधिक महिला व पुरुष कामगार काम करतात. तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नाही. मालवाहतूक करणारी वाहने देखील या ठिकाणी येताना उद्योजकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. नियमित छोटे मोठे अपघात घडून येत आहे. यासाठी लवकरात लवकर लोकप्रतिनिधींनी याची दखल घेत रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी उद्योजकांसह कामगार वर्गाने केली आहे. रस्त्याची दुरवस्था होऊन कामगारांना वाहने चालवणे मुश्किल झाले आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य कामगार महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. छोटे-मोठे मध्यम तसेच लघुउद्योग असतानाही प्रशासनाकडून रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असून प्रतिनिधी केवळ आश्वासन देत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी